गोंदियात भगत की कोठी ट्रेनला अपघात, एक डबा घसरल्याने ५० हून अधिक जखमी

गोंदियामध्ये झालेल्या अपघातात ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत
Bhagat ki kothi superfast express Bilaspur to Bhopal accident near by Gondia station Today 2 am morning
Bhagat ki kothi superfast express Bilaspur to Bhopal accident near by Gondia station Today 2 am morning

रायपूरहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या भगत की कोठी या ट्रेनला गोंदियाजवळ अपघात झाला. समोरून जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी या ट्रेनने धडक दिली. त्यामुळे या ट्रेनचा एक डबा घसरला आणि ५० जण जखमी झाले अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात ५० लोक जखमी झाले आहेत. या प्रवाशांवर खासगी आणि जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

गोंदियात नेमकी काय घडली घटना?

भगत की कोठी ही एक्स्प्रेस नागपूरच्या दिशेने जात होती. गोंदिया शहराच्या पाच किलोमीटर आधी रेल्वे पोहचली असता या रेल्वेने एका मालगाडीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर या ट्रेनचा एक डबा घसरला. या अपघातात ५० जण जखमी झाले. यापैकी १३ जणांच्या जखमा जास्त आहेत तर इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. या सगळ्या प्रवाशांवर खासगी आणि जिल्हा प्रशासन रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गोंदियाच्या जवळ हा अपघात झाला आहे.

रेल्वेचा वेग जास्त नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत तसंच बचाव कार्य सुरू केलं. गोंदियामध्ये हा अपघात पहाटे दोनच्या दरम्यान झाला.

रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या "भगत की कोठी" एक्स्प्रेसला गोंदिया शहरालगत अपघात झाला आहे. समोर जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी ट्रेनने मागून धडक दिली. धडक दिल्यानंतर रेल्वेचा एक डबा रुळावरून खाली घसरला आहे. या अपघातात 50 पेक्षा जास्त प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाश्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in