उदयनराजेंचं NCP सोबत अंडरस्टँडिंग; शिवेंद्रसिंहराजेंना का आली शंका?

उदयनराजे भोसले विरुद्ध शिवेंद्रराजे भोसले : साताऱ्यात भाजप नेत्यांमध्ये पुन्हा कलगीतुरा
Satara Politics : Bjp MLA shivendra raje bhosale slams udayanraje bhosale
Satara Politics : Bjp MLA shivendra raje bhosale slams udayanraje bhosale

-इम्तियाज मुजावर, सातारा

"छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांचं राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर अंडरस्टँडिंग असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात भाष्य केले नसावं. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी कोणावर टीका करायची. त्यांनी कुणाबद्दल बोलायचं ते मी सांगू शकत नाही," असं सांगत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी हल्लाच चढवला.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, "भाजप प्रवक्ते आणि राज्यपाल यांच्या विरोधात उदयनराजे आक्रमक झाले होते. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात उदयनराजे यांची चुपी का?," असा सवाल शिवेंद्रसिंह राजेंनी उपस्थित केला आहे.

उदयनराजे भाजपवर नाराज आहेत का? राष्ट्रवादीबरोबर उदयनराजे जाणार का? याबद्दल तर्कवितर्क लावले जात असून, याचं अनुषंगाने शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.

Satara Politics : Bjp MLA shivendra raje bhosale slams udayanraje bhosale
शरद पवारांच्या परवानगीशिवाय उद्धव ठाकरे... : केसरकरांचा मोठा आरोप

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीचं वक्तव्य केल्या, नंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी चुकीची वक्तव्य केल्यानंतर आता खासदार उदयनराजे गप्प का आहेत?, असा सवाल शिवेंद्रराजेंना विचारण्यात आला.

त्यावर ते म्हणाले, "नक्की. उदयनराजे यांचं राजकीय अंडरस्टँडिंग जर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत असेल, तर मला माहित नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या महापुरुषांच्या अपमानाबाबत किंवा अफजलखान आणि‌ औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर खासदार उदयनराजे गप्प का आहेत?, असा सवाल आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

Satara Politics : Bjp MLA shivendra raje bhosale slams udayanraje bhosale
नाईक, साळवी, देशमुख... ३ महिन्यात ठाकरेंचा तिसरा आमदार रडारवर

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नात उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातील जवळकीचेही वेगवेगळे अर्थ काढले गेले होते. उदयनराजे पुन्हा राष्ट्रवादीत जाऊ शकतात अशी चर्चा त्यावेळी जोरात रंगली होती.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील राजकीय वाद सातत्याने चव्हाट्यावर येतोय. आता साताऱ्यातील भाजपा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची चिन्ह दिसत असून, यावर उदयनराजे नक्की काय उत्तर देणार? सातारकरांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in