Nitin Gadkari: धुळे-नंदुरबारचे रस्ते अमेरिकेसारखे करतो: गडकरी
धुळे: येत्या तीन ते चार वर्षात धुळे आणि नंदुरबारचे रस्ते अमेरिकेतील रस्त्यासारखे करणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते धुळ्यात आयोजित विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. अनेक वर्षांपासून धुळे व नंदुरबार येथील रस्त्यांच्या कामासंदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत असून व विकास कामांचा शुभारंभही होत असल्याचा आनंद […]
ADVERTISEMENT

धुळे: येत्या तीन ते चार वर्षात धुळे आणि नंदुरबारचे रस्ते अमेरिकेतील रस्त्यासारखे करणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते धुळ्यात आयोजित विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
अनेक वर्षांपासून धुळे व नंदुरबार येथील रस्त्यांच्या कामासंदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत असून व विकास कामांचा शुभारंभही होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्य सरकारकडून सरकारी जागेचा प्रस्ताव द्यावा त्याठिकाणी पैसा खर्च करून धुळे व नंदुरबारमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारणार असून दोन्ही जिल्हे विकासाच्या दृष्टीने अग्रेसर होणार असल्याचे गडकरी म्हणाले.
तसे दोन्ही जिल्ह्यातून जाणारे सर्वच राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना मंजुरी दिली असून लवकरच त्याठिकाणी काम सुरु होणार असल्याचे ते म्हणाले.
धुळे व नंदुरबार जिल्हे हे मागासवर्गीय नसून दोनही जिल्हे विकासकामांमध्ये अग्रेसर दिसून येत आहेत. नवीन उद्योजकाच्या माध्यमातून तरुणांच्या हाती रोजगार देऊन दोन्ही जिल्हे विकसनशील बनवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.