प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित विरोधात ईडीकडून चार्जशीट दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले विरोधात ईडीने चार्जशीट दाखल केली आहे. ARA प्रॉपर्टीज आणि इतर दोन जमिनींच्या प्रकरणात ही चार्जशीट ईडीने दाखल केली आहे. अविनाश भोसले यांचं ABIL हे मुख्यालय सरकारी आणि कमिशन ऑफिसर्स यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेवर आहे. ही जमीन ईडीने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जप्त केली होती.

२६ जुलैला काय घडलं?

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सोमवारी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांच्यासह व्यावसायिक सत्येन टंडन यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल केली. येस बँक डीएचएफएलमध्ये (DHFL) ३,७०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ही चार्जशीट दाखल करण्यात आली. अविनाश भोसले हे महाराष्ट्रातील अनेक राजकारण्याच्या जवळचे व्यक्ती आहेत. या घोटाळ्याप्रकरणी सुरवातीला सीबीआयने त्यांना अटक केली होती त्यांनतर त्यांची ईडीने चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांना ईडीने अटकही केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, अशात आता त्यांच्या मुलाविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.

येस बँक-DHFL घोटाळा नक्की प्रकरण काय आहे?

येस बँक DHFL ची केस मार्च 2020 मध्ये CBI ने नोंदवली होती. त्यानंतर सीबीआय आणि ED ने येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर आणि DHFL चे तत्कालीन प्रोमोटर्स कपिल आणि धीरज वाधवन यांच्या घरावर छापे टाकले. या प्रकरणी राणा कपूर आणि कपिल वाधवन यांना अटक करण्यात आली होती. सीबीआय तपास सुरू करणार होती पण तोपर्यंत कोविड-१९ मुळे लॉकडाऊन जाहीर झाला. ईडीने २०२० मध्ये रेडियस ग्रुपच्या संजय छाब्रियांसह येस बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलेल्या अनेक लोकांचे जबाब नोंदवले होते. सीबीआयने नंतर जून २०२० पर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आणि राणा कपूर तसेच इतरांना ताब्यात घेतले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या प्रकरणात अविनाश भोसलेंचा काय रोल?

या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने भोसले यांना मे महिन्यात अटक केली होती. त्याआधी एप्रिल महिन्यात सीबीआयने या प्रकरणी भोसले, शाहिद बलवा आणि इतरांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकले होते. अविनाश भोसले यांनी येस बँकेकडून डीएचएफएलला कोट्यवधींचे कर्ज देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यात त्यांना कमिशन स्वरुपात काही रक्कम मिळणार होती असा आरोप भोसलेंवरती आहे.

संजय छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांची उभारणी करणाऱ्या एव्हेन्यू 54, वन महालक्ष्मी या तीन प्रकल्पांसाठी 2018 मध्ये भोसलेंच्या कंपनीने डीएचएफएलकडून सुमारे 69 कोटी रुपये घेतल्याचा आरोप सीबीआयने केला होता. वरील दोन्ही प्रकल्प हे संजय छाब्रिया आणि सहाना समुहाचे बिल्डर आणि हॉटेल व्यावसायिक सुधाकर शेट्टी वरळीमध्ये करणार होते.

ADVERTISEMENT

सीबीआयच्या तपासानुसार, एक करार झाला होता ज्या अंतर्गत भोसलेच्या कंपन्यांनी काही विशिष्ट सेवा पुरवायच्या होत्या, ज्यात आर्किटेक्चरल आणि इंजिनीअरिंग डिझाइन सल्लागार, बांधकाम सल्लागार, प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाज लावण्यासाठी सल्लागार, प्रकल्प बांधकाम आणि करार सल्लागार आणि आर्थिक मूल्यांकन यांचा समावेश होता. परंतु तपासाअंती सीबीआय अधिकार्‍यांना असे आढळून आले की अशा कोणत्याही सेवा पुरविल्या गेल्या नाहीत. उलट कोणतेही काम किंवा सेवा न देता संपूर्ण रक्कम भोसलेंनी घेतली. भोसलेंनी कोणतेच काम केले नाही मग रक्कम त्यांना कशी दिली गेली याचा तपास सीबीआयने पुढे सुरु केला.

ADVERTISEMENT

तपासाअंती ED ने अविनाश भोसलेला 28 जून रोजी अटक केली. त्यानंतर त्यांना नऊ दिवस ईडी कोठडीत पाठवण्यात आले, नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आता सीबीआयने नवीन चार्टशिट दाखल केली आहे, यामध्ये त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT