एकनाथ शिंदे विदर्भात उद्धव ठाकरेंना देणार धक्का?’ दौऱ्यापूर्वी 6 जिल्ह्यांत नेत्यांवर सोपवली जबाबदारी
राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षाबरोबरच शिंदे गटानंही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मराठवाड्यात दौरा केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विदर्भावर लक्ष्य केंद्रीत केलं असून, लवकरच दौरा करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (६ सप्टेंबर) शिंदे गटाकडून नागपूर शहरासह सहा जिल्ह्यांत विविध पदावर नियुक्त्या करण्यात […]
ADVERTISEMENT

राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षाबरोबरच शिंदे गटानंही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
मराठवाड्यात दौरा केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विदर्भावर लक्ष्य केंद्रीत केलं असून, लवकरच दौरा करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (६ सप्टेंबर) शिंदे गटाकडून नागपूर शहरासह सहा जिल्ह्यांत विविध पदावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
एकनाथ शिंदे विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार
शिंदे गटाचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने आणि पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव यांनी पत्रकार परिषद घेऊन नियुक्त्या जाहीर केल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री तथा शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे विदर्भाचा दौरा करणार असल्याची माहिती दिली.
एकनाथ शिंदे नोव्हेंबरमध्ये पूर्व विदर्भाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात दोन मेळावे आयोजित केले जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका भाजपसोबत युतीमध्ये लढणार असून, आगामी सर्व निवडणुकीत भाजप-शिवसेना विजयी होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत शिंदे गटाकडून देण्यात आली.