माजी मंत्र्यांच्या घरी तैनात असलेल्या पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

Gadhchiroli News : गडचिरोलीतील घटना, दोन महिन्यांत घडली दुसरी घटना
माजी मंत्र्यांच्या घरी तैनात असलेल्या पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात तैनात पोलीस शिपायाने गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. नितेश अशोक भैसारे (३६) असे मृत शिपायाचं नाव आहे.

नितेश भैसारे अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. आज माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी नीतेशची ड्युटी लावण्यात आली होती.

Former Guardian Minister Ambrishrao Atram's security guard committed suicide by shooting himself
Former Guardian Minister Ambrishrao Atram's security guard committed suicide by shooting himself

ड्युटीवर येताच त्याने आपल्या बंदुकीतून गोळी झाडली. यात घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. नीतेश भैसारे हा मूळ चंद्रपूर येथील रहिवासी असून, पत्नी, मुलगा व मुलीसह तो अहेरी येथे वास्तव्य करीत होता.

त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पोलीस घटनेचा तपास करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी सांगितलं.

Former Guardian Minister Ambrishrao Atram's security guard committed suicide by shooting himself
Former Guardian Minister Ambrishrao Atram's security guard committed suicide by shooting himself

दोन महिन्यातील दुसरी घटना

अहेरी येथे राजकीय नेत्यांच्या निवासस्थानी नेमणूक झालेल्या पोलीस शिपायानं आत्महत्या करण्याची ही दोन महिन्यांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी २० फेब्रुवारीला माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या निवासस्थानी तैनात शिपायाने गोळी झाडून आत्महत्या केली होती.

आज माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी तैनात शिपायाने तेच पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविली.

Related Stories

No stories found.