कोल्हापूर : …अन् दबा धरून बसलेल्या काळाने घातली झडप; चार कॉलेज तरुणींचा मृत्यू

मुंबई तक

पाण्याचा अंदाज न घेता अंघोळीसाठी पाण्यात उतरणं चार कॉलेज तरुणींचा जिवाशी आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील किटवाड धबधब्याजवळ चार कॉलेज तरुणींचा बुडून मृत्यू झाला. सुदैवाने या दुर्घटनेतून एक तरुणी बचावली आहे. मृत्यू झालेल्या चारही तरुणी बेळगाव जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. कोल्हापूर जिल्हा चंदगड तालुक्यातील किटवाड धबधब्याजवळ चार तरुणींना पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरण्याच्या धाडसामुळे जीव […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पाण्याचा अंदाज न घेता अंघोळीसाठी पाण्यात उतरणं चार कॉलेज तरुणींचा जिवाशी आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील किटवाड धबधब्याजवळ चार कॉलेज तरुणींचा बुडून मृत्यू झाला. सुदैवाने या दुर्घटनेतून एक तरुणी बचावली आहे. मृत्यू झालेल्या चारही तरुणी बेळगाव जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.

कोल्हापूर जिल्हा चंदगड तालुक्यातील किटवाड धबधब्याजवळ चार तरुणींना पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरण्याच्या धाडसामुळे जीव गमावावा लागला. लघुपाटबंधारे धरणाच्या धबधब्याच्या ठिकाणी खोल खड्ड्यात पडून बेळगाव येथील चार मुलींचा जागीच मृत्यू झालाय. तर एका तरुणीला वाचवण्यात किटवाड येथील तीन तरुणांना यश आलंय. आज सकाळी या तरुणी कर्नाटकातील बेळगावमधील उज्ज्वलनगर, अनगोळ येथील रहिवाशी आहेत. चंदगड पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आलीय.

पाण्यात उतरल्या अन् घात झाला

कोल्हापुर जिल्हा चंदगड तालुक्यातील किटवाड इंथ लघुपाटबंधारे विभागाची दोन धरण असून, सदर घटना ही एक क्रमांकाच्या धरणावर घडली आहे. या ठिकाणी धबधब्याचे पाणी पडून पुढे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या सुमारे १२ फूट खोल खड्ड्यात या तरुणी अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या होत्या.

पहिली तरुणी खड्ड्यात पडल्याने दुसरी तिला वाचवण्यासाठी गेली. त्यानंतर तिसरी वाचवण्यासाठी गेली, त्यानंतर चौथी असे करत एकापाठोपाठ पाच तरुणी त्या पाणी असलेल्या मोठ्या खड्ड्यात पडल्या आणि पाचही जणी बुडाल्या.

यामधील चार तरुणींचा जागीच मृत्यू झाला. तर एकीची प्रकृती गंभीर आहे. तिला उपचारासाठी बेळगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आशिया मुजावर, कुडशिया हासम पटेल, रुकसार भिस्ती आणि तस्मिया या चोघींचा जागीच मृत्यू झाला.

आज सकाळी बेळगाव येथील अनेक कुटुंबातील सुमारे चाळीस जण धरणाच्या ठिकाणी सहलीसाठी आले होते. त्यावेळी ही दुर्दैवाने घटना घडली. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp