कल्याण : ‘मी शिवसेना बोलतेय’ देखावा पोलिसांनी हटवला; विजय तरुण मंडळानं घेतला मोठा निर्णय
गणेशोत्सवात गणरायाच्या मूर्तीबरोबर एका गोष्टीची हमखास चर्चा होते, ती म्हणजे देखावे. वेगवेगळे विषय घेऊन गणेश मंडळांकडून देखावे साकारले जातात. यंदा महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घडामोडींनंतर गणरायाचं आगमन झालं. त्यामुळे कल्याणमधील विजय तरुण मित्रमंडळाने शिवसेनेतील बंडखोरीबद्दलचा चलचित्र देखावा साकारला. या देखाव्यावर कल्याण पोलिसांनी कारवाई केली असून, साहित्य जप्त केलं आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर विजय तरुण मंडळाने गणेश मूर्तीची […]
ADVERTISEMENT

गणेशोत्सवात गणरायाच्या मूर्तीबरोबर एका गोष्टीची हमखास चर्चा होते, ती म्हणजे देखावे. वेगवेगळे विषय घेऊन गणेश मंडळांकडून देखावे साकारले जातात. यंदा महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घडामोडींनंतर गणरायाचं आगमन झालं. त्यामुळे कल्याणमधील विजय तरुण मित्रमंडळाने शिवसेनेतील बंडखोरीबद्दलचा चलचित्र देखावा साकारला. या देखाव्यावर कल्याण पोलिसांनी कारवाई केली असून, साहित्य जप्त केलं आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर विजय तरुण मंडळाने गणेश मूर्तीची स्थापना न करण्याचा निर्णय घेतलाय.
कल्याणमध्ये विजय तरुण मंडळाने यंदा शिवसेनेतील राजकीय घडामोडींवर चलचित्र देखावा साकारला होता. ‘पक्ष निष्ठा’ असा विषय घेऊन चलचित्र देखावा साकारण्यात आला. ‘मी शिवसेना बोलतेय’ इथून या चलचित्र देखाव्याची सुरूवात करण्यात होती.
पोलिसांनी जप्त केलेला विजय तरुण मंडळाचा देखावा कसा होता?
या देखाव्यात शिवसेनेला मोठा वृक्षाच्या स्वरूपात दाखवण्यात आलेलं आहे. या वृक्षाला फळे लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात, अशा आशयाचा हा देखावा आहे. या देखाव्यावर कल्याण पोलिसांनी आक्षेप घेतला. कल्याण पोलिसांनी देखाव्यावर आज (३१ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास कारवाई केली. पोलिसांनी देखाव्याची सगळं साहित्य जप्त केलं.
Ganesh Chaturthi 2022 : अशा प्रकारे करा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा, घरी नांदेल सुख, समृद्धी आणि शांतता