Lalbaugcha Raja 2023: लालबागचा राजा मंडळाचे कार्यकर्ते ‘बडवे’ झाले का?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

lalbaugcha raja 2023 viral video crowd pushing in the and pandal workers conciet
lalbaugcha raja 2023 viral video crowd pushing in the and pandal workers conciet
social share
google news

Lalbaugcha Raja Ganpati Mandal: मुंबई: मुंबईतील गणेशोत्सव (Ganeshostav) म्हटलं की, ‘लालबागचा राजा’ (Lalbaugcha Raja) हे आता समीकरण होऊन गेलं आहे. खरं तर मुंबईतील गणपती हीच खरी गणेशोत्सवाची ओळख होती. बाप्पाच्या अनेक उंचच, उंच मूर्ती.. देखावे, चलचित्र ही भाविकांसाठी खरी तरी मेजवानी असायची. पण 2000 साल उजाडलं आणि नव्या दशकात मुंबईतील (Mumbai) गणेशोत्सवाचा तोंडवळाच बदलला.. मुंबईच्या गणेशोत्सव म्हणजे ‘लालबागचा राजा’ ही ओळख झाली. लाखो लोकं तासनतास रांगेत उभं राहून राजाचं दर्शन घेऊ लागले. पण इथूनच सुरू झाली राजाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी.. (lalbaugcha raja 2023 viral video crowd pushing in the and pandal workers conciet)

साधारण पंचवीस एक वर्ष झाली आता लालबागच्या राजाच्या मंडपातील गर्दी ही त्यांचेच सगळे रेकॉर्ड मोडीत काढत आहेत. पण असं असूनही या मंडळाला अजिबात गर्दीचं नियोजन करता आलेलं नाही. वाढत्या गर्दीचं नियोजन कसं करावं यासाठी मंडळ कोणत्याही आधुनिक सोयी-सुविधा किंवा तंत्रज्ञान न वापरता आजही परंपरागत आणि जुन्याच गोष्टींवर भर देताना दिसतंय. पण यातूनच आज मोठ्या प्रमाणात भाविकांना त्रास सहन करावा लागतोय. पण मंडळाच्या लेखी त्याला शून्य किंमत असल्याचं पाहायला मिळतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Tak (@mumbaitak)

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> लालबागच्या राजाच्या पायावर छत्रपतींच्या ‘राजमुद्रा’ने वाद! संभाजीराजे भडकले

‘लालबागचा राजा’ हा खरं तर पूर्वी गिरणगावातील म्हणजे लालबाग-परळ भागातील एक छोटंसं गणपती मंडळ.. पण नव्या दशकात या मंडळाला जी प्रसिद्धी मिळाली त्याने सगळ्यांचे डोळे दिपवून टाकले. अचानक राजाच्या चरणी लाखोंची गर्दी वाढली. पण हे सगळं नेमकं घडलं कसं? असा आजही अनेकांना प्रश्न पडलाय.. तर याबाबत वरिष्ठ संपादक सचिन परब यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी समोर आणल्या आहेत.

मीडिया अन् नवसाला पावणारा बाप्पा…

सचिन परब म्हणातात की, नवं शतक लालबागच्या राजासाठी नवं स्थित्यंतर घेऊन आलं. २००३ साली मुंबईतल्या एका नव्या स्थानिक पण सॅटेलाईट न्यूज चॅनलने लालबागचा राजा चोवीस तास दाखवला. हे चॅनल विश्वाचा ‘सहारा’ असलेल्या राजाच्या मंडळाचाही ‘सहारा’ बनलं. तेव्हा ओबी वॅन नवीन होत्या. चोवीस तास एक गणपती टीव्हीवर दिसणं ही खरंच नवी आणि वेगळी संकल्पना होती. इतर कार्यक्रम सुरू असतानादेखील खाली छोट्या चौकटीत राजा दिसत राहायचा. पण दिवसतला जास्तीत जास्त काळ स्क्रीनभर बाप्पाचंच दर्शन होत राहायचं.

आरत्या, पूजा, मंडळाचे पदाधिकारी आणि भक्तांचे इंटरव्यू दाखवून झाले. आता चोवीस तास दाखवायचं काय, हा प्रश्न होता. मग संध्याकाळी प्राईम टाईमच्या वेळेत छोटे मोठे कलाकार, राजकीय पुढारी यांना मंडपात आणण्यात या चॅनलनेच पुढाकार घेतला. शेजारच्या चिवडा गल्लीत इंग्रजी सिनेसाप्ताहिक ‘स्क्रीन’चं ऑफिसही नुकतंच आलं होतं. तिथे सिंनेमा आणि टीव्हीतल्या कलाकारांचा राबता होता. त्यांनाही मच्छी मार्केटच्या शॉर्टकटने मंडपात आणलं जात होतं. सहज टीव्हीवर झळकायला कलाकारांची ना नव्हतीच. सोबत देवदर्शनही होऊन जायचं.

त्या काळात सगळंच जुळून आलं होतं. लालबागच्या राजाच्या पदाधिका-यांना मीडियाचं महत्त्व कळलं होतं. त्यासाठी ते नीट प्रयत्नही करत होते. एका मोठ्या एक्स्प्रेस ग्रुपचं ऑफिस लालबागच्या राजाच्या शेजारीच आलं होतं. कधी गिरणगाव जवळून न पाहिलेल्यांना तिथल्या गर्दीने चक्रावून टाकलं होतं.

बहुदा २००३ सालीच एका बिल्डरने लालबागच्या राजाला नवस पू्र्ण झाला म्हणून पाच किलो सोनं दिलं होतं. हा आकडा डोळे पांढरं करणाराच होता. शिवाय तो बिल्डर लालबागच्या राजासमोरच अगरबत्ती हार विकत असे हे कळल्यावर तर लोकांना धक्काच बसला. टीव्ही चॅनल्सवर नवसाच्या रांगेतल्यांचे इंटरव्यू सुरू असत. लालबागच्या राजाच्या कृपेने कुणाला मूल झालं होतं. कुणाला नोकरी लागली होती. कुणाच्या मुलीचं लग्न झालं होतं. लोक बघत होते. खरं तर मुंबईतली सगळीच जुनी मंडळं भाविकांच्या श्रद्धेचं स्थान होतीच. बाप्पा सगळीकडेच लोकांच्या नवसाला पावत असल्याच्या कथा ऐकू येत असत. पण तिथे या कथा मीडियासमोर क्वचितच आल्या.

लालबागच्या राजाकडे दाखवण्यासाठी देखावा नव्हता, चलचित्र नव्हती. होत्या त्या नवसाच्या कथा. तरीही भक्तांच्या या कथा ऐकून नव्या भक्तांची रांग राजाच्या मंडपात लागली. लोक देशाच्या कानाकोप-यातूनही येऊ लागले. कारण लालबागच्या राजा नवसाला पावतो याचे दाखले त्यांनी टीव्हीवरच पाहिले होते.

आता ज्या गर्दीमुळे मंडळ प्रसिद्धीस आलं तीच गर्दी मंडळाच्या कार्यकर्त्यांना नकोशी झालीए. कारण मंडळाला आता हवे आहेत फक्त सेलिब्रिटी आणि उद्योजक.. आपल्या मंडळात गृहमंत्री, मुख्यमंत्री येतात जगातील श्रीमंत उद्योजक येतात.. या सगळ्याची मुजोरी कार्यकर्त्यांच्या वागण्या-बोलण्यात आता दिसून येते. आता हे काही फक्त आरोप नाही तर अनेक सामान्य भाविकांचे आजवरचे अनुभव आहेत.

ADVERTISEMENT

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Tak (@mumbaitak)

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेने ठोठावला ३ लाख ६६ हजारांचा दंड, कारण काय आहे माहित आहे?

यंदा देखील असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत की, जिथे सामान्य भाविकांना अक्षरश: बाप्पाच्या समोरच कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली. तर अनेक तास रांगेत उभं राहणारे भाविक हे जेव्हा राजासमोर येतात तेव्हा हेच कार्यकर्ते अक्षरश: गुरांसारखी वागणूक भाविकांना देतात. कधी कार्यकर्ते भाविकांना भिडतात तर कधी पोलिसांनाही नडतात.

हीच मुजोरी या मंडळाकडे येते कुठून? असा सवाल अनेकजण विचारतात… कधीकाळी गर्दीचा राजा असलेला लालबागचा राजा हा आता सेलिब्रिटींचा राजा झालाय. पण मंडळ आणि त्याचे कार्यकर्ते हे सोयीस्करपणे विसरले आहेत की, या गर्दीनेच तुमच्या मंडळाला मोठं केलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Tak (@mumbaitak)

भाविक दरवर्षी धक्के खात, अपमान सहन करत राजाच्या चरणापर्यंत पोहचतात.. पण ज्या दिवशी हाच सामान्य माणूस तुमच्या मंडळाकडे पाठ फिरवेल तेव्हाच मंडळाच्या कार्यकर्त्यांची खरी मुजोरी उतरेल.. असं म्हणतात की, जगात काहीही शाश्वत नाही.. त्यामुळे आज राजाच्या समोर गर्दी आहे.. पण ती भविष्यात असेलच असं नाही.. जेव्हा घर फिरतं तेव्हा घराचे वासेही फिरतात.. आज गर्दीमुळे सेलिब्रिटी मंडळाच्या दारी येतात.. पण ज्या दिवशी ही गर्दी ओसरेल तेव्हा मंडळाची किंमत शून्य असेल… कधी काळी मीडिया मॅनेज केलेल्या या मंडळाने हा इशारा वेळीच ओळखावा, अन्यथा…

राजा बुद्धी दे बाबा… 

या लेखातील मतं ही पूर्णपणे लेखकाची आहेत. त्या मताशी मुंबई Tak सहमत असेलच असं नाही..

    follow whatsapp

    ADVERTISEMENT