जळगावच्या योगेश बडगुजरची उत्तुंग भरारी! युरोप खंडातील सर्वोच्च शिखर एल्ब्रुसवर फडकवला तिरंगा !

१५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी युरोप खंडातील सर्वात मोठे उंच शिखर एल्ब्रुस हे शिखर योगेशने सर केलं
Great performance of Yogesh Badgujar of Jalgaon! Tricolor hoisted on Elbrus, the highest peak in Europe
Great performance of Yogesh Badgujar of Jalgaon! Tricolor hoisted on Elbrus, the highest peak in Europe

मनिष जोग, प्रतिनिधी, जळगाव

एकीकडे भारत देश स्वातंत्र्यदिनाच्या ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असताना जळगावच्या दादावाडी येथील रहिवाशी असलेल्या योगेश बडगुजर या तरुण गिर्यारोहकाने १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी युरोप खंडातील सर्वात मोठे उंच शिखर एल्ब्रुस (५६४२ मीटर १८५१० फूट उंच ) सर करून आपल्या देशाचा तिरंगा ध्वज मोठ्या डौलाने फडकवत खान्देशाची मान उंचावली आहे. त्याच्या या यशाने खान्देशासह संपूर्ण भारतातून त्याच्या या यशाचे कौतुक केले जात आहे.

Tricolor hoisted on Elbrus, the highest peak in Europe
Tricolor hoisted on Elbrus, the highest peak in Europe

योगेश बडगुजर या गिर्यारोहकाचा अनोखा विक्रम

या अगोदर योगेश बडगुजर याने २५ जून २०२२ रोजी आफ़्रिका खंडातिल सर्वात उंच शिखर माउंट किलिमांजारो ५८९५ मीटर १९३४१ फूट उंच शिखर सकाळी ०७.४५ वाजता सर केले होते. योगेश प्रकाश बडगुजर हा अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला तरुण असून त्याला लहानपणापासून गिर्यारोहणाची आवड असल्याने जगातील बहुतांश शिखरं पादाक्रांत करण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आफ्रिका आणि युरोप खंडातील सर्वात उंच शिखरे सर करून खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

तसंच त्याने महाराष्ट्रातील सोंडाई , कर्नाळा , पेबविकट ,कळसुबाई आणि माहुली तसेच सिक्कीम मधील रेनॉक आदी शिखरं त्याने सर केली आहेत .जळगावातील दादा वाडी परिसरात योगेशचे वडील प्रकाश बडगुजर हे पत्नीसह राहत असून योगेश यांच्या बहिणेचे लग्न झाले असून एक भाऊ आहे . तर योगेश हा मुंबई महानगरपालिकेतील अग्निशमन दलात गेल्या ५ वर्षांपासून फायरमन या पदावर कार्यरत आहे. दरम्यान योगेश बडगुजर हा १९ रोजी जळगावात येत असल्याची माहिती त्याने दिली

जगातील ७ खंडांमधील सर्वात उंच शिखरे पादाक्रांत करण्याचा संकल्प

जगामध्ये ७ खंड असून योगेशने युरोप ,आफ्रिका या खंडातील सर्वात उंच शिखरे पादाक्रांत केली आहेत . तसेच उत्तर अमेरिका खंडातील डेनाली ६ हजार १९० मीटर , दक्षिण अमेरिका खंडातील माउंट ऑक्सोबोव्ह ६ हजार ९६२ मीटर , अंटार्टिका खंडातील विन्सन मासीक ४ हजार ८९२ , ऑस्ट्रेलिया खंडातील कॉस्ट्यूज को २ हजार २२८ मीटर आणि आशिया खंड तसेच जगातील सर्वात मोठे शिखर एव्हरेस्ट ८ हजार ८४८ . ८६ मीटर उंचीचे शिखर पादाक्रांत करण्याचा मनोदय योगेश बडगुजर याने बोलून दाखविला.जगातील सर्वात मोठे शिखर असलेले एव्हरेस्ट सर करण्याचा संकल्प असून यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणी येत असल्याने एव्हरेस्टवर अद्याप चढाई शक्य नसल्याची खंत योगेश याने बोलून दाखविली ...

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in