महापुराचा फटका बसलेल्या चिपळूणमध्ये मशिदींवरचे भोंगे वाजणारच! ‘हे’ आहे कारण
राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी मशिदीवरील भोंग्यांवरून सध्या राजकिय वातावरण ढवळून निघालं आहे. एकीकडे हे सर्व सुरू असताना याच भोंग्यांच्या एका निर्णयाबाबत चिपळूण नगर परिषद जोरदार चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी चिपळूणमध्ये आलेल्या महापुराने चिपळूण शहर पूर्ण उद्धवस्त झालं होतं. मोठा आर्थिक फटका चिपळूणला बसला होता. अनेकांची आयुष्यभराची पुंजी या महापुराने हिरावून नेली. या उद्धवस्त चिपळूणला […]
ADVERTISEMENT

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी
मशिदीवरील भोंग्यांवरून सध्या राजकिय वातावरण ढवळून निघालं आहे. एकीकडे हे सर्व सुरू असताना याच भोंग्यांच्या एका निर्णयाबाबत चिपळूण नगर परिषद जोरदार चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी चिपळूणमध्ये आलेल्या महापुराने चिपळूण शहर पूर्ण उद्धवस्त झालं होतं. मोठा आर्थिक फटका चिपळूणला बसला होता.
अनेकांची आयुष्यभराची पुंजी या महापुराने हिरावून नेली. या उद्धवस्त चिपळूणला सावरण्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे आले होते. त्यामुळे चिपळूण यातून सावरून पुन्हा उभं राहिलं आहे. आता पावसाळा जवळ येऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीसारखी परिस्थिती उद्भवल्यास काय दक्षता घ्यायची यासाठी प्रशासन स्तरावर खबरदारी घेतली जात आहे. अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. अशाच एका आगळ्यावेगळ्या निर्णयामुळे चिपळूण नगर परिषद चर्चेत आली आहे. एकीकडे मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण सुरू असताना चिपळूण नगर परिषदेने मशिदींवरील भोंग्यांचा वापर चिपळूणमध्ये पुरासारखी आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास करण्याचं ठरवलं आहे.
.