Hardeep Singh Nijjar : कोण होता खलिस्तानी दहशतवादी? ज्याच्या हत्येने भारत-कॅनडा संबंध झाले खराब
18 जून 2023 ला कॅनडाच्या सरे शहरात हरदीप सिंग निज्जरची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाच्या तीन महिन्यानंतर आता मोठा वाद पेटला आहे. त्यामुळे भारत-कॅनडा संबंध नेमके का ताणले गेले आहेत? आणि हरदीप सिंग निज्जर हा नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

India-Canada dispute : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) हत्याकांड प्रकरणाने सध्या भारत-कॅनडा संबंध ताणले गेले आहेत. 18 जून 2023 ला कॅनडाच्या सरे शहरात हरदीप सिंग निज्जरची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाच्या तीन महिन्यानंतर आता मोठा वाद पेटला आहे. त्यामुळे भारत-कॅनडा संबंध नेमके का ताणले गेले आहेत? आणि हरदीप सिंग निज्जर हा नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात. (india canada dispute pm narendra modi justin trudeau who is hardeep singh nijjar)
नेमका वाद काय?
हरदीप सिंग निज्जरच्या हत्याकांडाच्या तब्बल तीन महिन्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेओने भारतावर गंभीर आरोप केला होता. कॅनडाने हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणाचा तपास करून या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.या आरोपानंतर कॅनडा सरकारने तिथल्या भारताच्या उच्चायुक्तांची हक्कालपट्टी केली होती. त्यामुळे यावर आता भारताने सुद्धा त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
कॅनडाने भारताच्या उच्चायुक्तांची हक्कालपट्टी केल्यानंतर भारताने देखील देशातील कॅनडातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत निवेदन जारी करून माहिती दिली. भारतात असलेल्या कॅनडाच्या एका उच्चाधिकाऱ्याला पुढच्या पाच दिवसांत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हत्येचे प्रकरण काय?
18 जून 2023 ला कॅनडाच्या सरे शहरात हरदीप सिंग निज्जरची हत्या करण्यात आली. एका गुरूद्वाराच्या पार्किंगमध्ये दोन तरूणांनी निज्जरवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. हरदीप सिंग निज्जर खलिस्तानी समर्थक असल्याची माहिती समोर आली होती. या हरदीप सिंग निज्जरमुळे आता भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.