महाराष्ट्रातील 40 गावांवर कर्नाटकचा डोळा! बसवराज बोम्मईंच्या विधानानं सीमा वाद चिघळणार

मुंबई तक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद बसवराज बोम्मई यांच्या विधानानं चिघळण्याची शक्यता निर्माण झालीये. महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचं विधान बोम्मईंनी केलंय. त्यामुळे महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झालीये. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट आहे. अशातच बसवराज बोम्मईंनी केलेल्या विधानाने हा सीमावाद पुन्हा ऐरणीवर आलाय. बसवराज बोम्मई म्हणाले, ‘महाराष्ट्रातील कन्नड माध्यमांच्या शाळांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद बसवराज बोम्मई यांच्या विधानानं चिघळण्याची शक्यता निर्माण झालीये. महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचं विधान बोम्मईंनी केलंय. त्यामुळे महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झालीये.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट आहे. अशातच बसवराज बोम्मईंनी केलेल्या विधानाने हा सीमावाद पुन्हा ऐरणीवर आलाय. बसवराज बोम्मई म्हणाले, ‘महाराष्ट्रातील कन्नड माध्यमांच्या शाळांना कर्नाटक सरकार अनुदान देईल. शेजारील राज्यातील कन्नड स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शनही देण्यात येईल.”

बोम्मई पुढे असंही म्हणाले की, “सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे. तेथील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केलेला आहे. या तालुक्याला पाणी देण्याचा आराखडा आम्ही तयार केला आहे. कर्नाटकात सामील होण्याच्या जत तालुक्याच्या ठरावावर आम्ही गंभीरपणे विचार करीत आहोत,” असं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीनंतर बोम्मईंचं विधान

बसवराज बोम्मई यांच्या विधानाला पार्श्वभूमी आहे ती दोन दिवसांपूर्वी म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीची. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उच्चाधिकार समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp