कसबा पोटनिवडणूक 2023 : पुन्हा कमळ फुलवण्यासाठी भाजपची ‘समिती’ रणनीती!

मुंबई तक

kasba peth assembly constituency latest update : मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात (kasba peth assembly constituency) पोटनिवडणूक (by Election 2023) होत आहे. या निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाची बैठक पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्या घरी पार पडली. या बैठकीत भाजप उमेदवाराचा मोठ्या मतांनी विजय करण्यासाठी खास रणनीती […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

kasba peth assembly constituency latest update : मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात (kasba peth assembly constituency) पोटनिवडणूक (by Election 2023) होत आहे. या निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाची बैठक पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्या घरी पार पडली. या बैठकीत भाजप उमेदवाराचा मोठ्या मतांनी विजय करण्यासाठी खास रणनीती निश्चित करण्यात आली.

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्या घरी बैठक झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक 2023 : 32 नेत्यांची चंद्रकांत पाटलांच्या घरी बैठक

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दोन्ही मतदारसंघ भाजपचे परंपरागत मतदारसंघ आहे आणि पुरेसा आधी विचार आणि पुरेसा खोल विचार करणं ही आमची कार्य पद्धती आहे. मतदारसंघ हक्काचेही असूनही आम्ही तयारीला लागलो आहोत.”

“ही निवडणूक केवळ कसब्याची नाही, पूर्ण शहराने ती निवडणूक स्वीकारली पाहिजे. त्यामुळे शहरातील 32 नेत्यांची माझ्या घरी बैठक झाली. माझ्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यानं मी सगळ्यांना विनंती केली की, माझ्या घरी बैठक बोलवावी लागली. कसब्यातील पक्ष कार्यालयात आमच्या पुढच्या बैठका होतील”, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

कमळ चिन्ह हाच उमेदवार समजून प्रचाराला सुरूवात -चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील उमेदवाराबद्दल बोलताना म्हणाले, “या बैठकीत सांगोपांग विचार करण्यात आला. उमेदवारांची चर्चा सोडून ही चर्चा झाली. राज्याचं संसदीय मंडळ जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. मात्र उमेदवार निश्चित होईलपर्यंत कमळ चिन्ह हाच उमेदवार समजून कामाला सुरूवात केली आहे”, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp