Cabinet Meeting: मंत्रिमंडळांच्या बैठकीत 2 मोठे निर्णय, संपूर्ण निर्णयांची यादी एका क्लिकवर
Politics in Marathi: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (28 जून) पार पडली. ज्यामध्ये दोन मोठे निर्णय घेण्यात आले. जाणून घ्या मंत्रिमंडळात नेमके कोणकोणते निर्णय हे घेण्यात आले.
ADVERTISEMENT

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखालील आज (28 जून) राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting)पार पडली. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र, यामधील दोन महत्त्वाचे निर्णय म्हणजे वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा आणि दुसरा निर्णय हा एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा-शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा. या दोन्ही निर्णयांशिवाय इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पाहा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले सगळे महत्त्वाचे निर्णय. (maharashtra government cabinet meeting two major decisions versova bandra sagari setu swatantra veer savarkar shivdi nava sheva atal setu cm eknath shinde)
मंत्रिमंडळ निर्णय:
* वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव
(सार्वजनिक बांधकाम)
* एमटीएचएल ला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव
( नगर विकास विभाग)
* राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. 210 कोटीस मान्यता
( सार्वजनिक आरोग्य विभाग )










