Maharashtra News Live: आमदार हसन मुश्रीफ यांची ईडी कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया…
बुलेट चालवत पिस्टल हातात घेऊन रिल्स बनवणं भोवलं नगरसेवकाच्या मुलावर कारवाई… राष्ट्रवादीचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड व राजू भंडारी या दोघांनी अपवादात्मक रिल्स तयार करून फेसबुकवर अपलोड केले आहे. हात सोडून बुलेट चालवत हातात पिस्टल घेऊन त्यांनी रिल्स तयार केले.हे सोशल मीडियावर वायरल होताच सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सलगरवस्ती […]
ADVERTISEMENT

बुलेट चालवत पिस्टल हातात घेऊन रिल्स बनवणं भोवलं नगरसेवकाच्या मुलावर कारवाई…
राष्ट्रवादीचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड व राजू भंडारी या दोघांनी अपवादात्मक रिल्स तयार करून फेसबुकवर अपलोड केले आहे. हात सोडून बुलेट चालवत हातात पिस्टल घेऊन त्यांनी रिल्स तयार केले.हे सोशल मीडियावर वायरल होताच सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सलगरवस्ती पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले सचिन शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.फिर्यादीत नमूद केल्यानुसार रिल्स तयार करणाऱ्यावर भा.द.वि.505,279 व भारतीय शस्त्र अधिनियमनुसार गुन्हा दाखल झाला.
सलगरवस्ती पोलीस सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रिल्समुळे सावध झाले आहेत.रिल्स तयार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार दोघांना बोलावून त्यांची पिस्टल जप्त केली जाणार आहे. तसचं, ती पिस्टल खरी आहे का याची शहानिशा केली जाणार आहे.खरी पिस्टल असेल तर ती जप्त करून शस्त्र परवान्याबाबत चौकशी केली जाईल.