Dahi Handi 2022 : मुंबई ७० हून जास्त तर ठाण्यात ३५ गोविंदा जखमी

मुंबईत ७० हून जास्त गोविंदा जखमी झाले तर ठाण्यात ३५ गोविंदा जखमी झाले
Dahi Handi 2022: More than 70 Govinda injured in Mumbai and 35 Govinda injured in Thane
Dahi Handi 2022: More than 70 Govinda injured in Mumbai and 35 Govinda injured in Thane

कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. दहीहंडीच्या उत्सवात थरांचा थरार आज महाराष्ट्राने पाहिला. ढाक्कुमाकुमचा गजरही आज राज्यात निनादला. यंदाच्या दहीहंडीत सिने तारेतारकांनीही सहभाग घेतला होता. दहीहंडीच्या उत्सवावर विरजण पडेल अशा घटना घडल्या नाहीत. मात्र संपूर्ण दिवसभरात मुंबईत ७० हून जास्त गोविंदा जखमी झाले. तर ठाण्यात ३५ गोविंदा जखमी झाले.

दहीहंडीत मुंबईत ७० हून अधिक गोविंदा जखमी

मुंबईत दिवसभरात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवादरम्यान किरकोळ अपघात झाले. या अपघातांमध्ये ७० हून जास्त गोविंदा जखमी झाले. यापैकी ६० हून जास्त गोविंदांना उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे. ११ गोविंदांना रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. मुंबईत ज्या गोविंदांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांची भेट माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

ठाण्यात ३५ गोविंदा जखमी झाले

यंदाच्या वर्षी दहीहंडी उत्सवात थरावरून पडून ३५ गोविंदा किरकोळ जखमी आहे. त्यापैकी २९ जणांवर प्राथमिक उपचार करून सोडण्यात आलं. ६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एक ३८ वर्षीय सूरज पारकर यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कळवा येथील वाघोबा नगर येथे राहणारा नितीन चव्हाण (१६) कोपरीतील गांधीनगर येथील शैलेश पाठक (३२)शितलू तिवारी (२५) या दोघांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. साहिल जोगळे (१५) डाव्या हाताला दुखापत.. या सर्वांवर उपचार करून घरी सोडण्यात आले. या जखमींची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयासह छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात करण्यात आली आहे.

जांबोरी मैदानात तिसऱ्या थरावरून गोविंदा बेशुद्ध

जांबोरी मैदानात थर लावत असताना तिसऱ्या थरावरुन पडून एक गोविंदा बेशुद्ध झाला. त्याला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. करण सावंत ( वय २२ वर्षे) असे या गोविंदाचे नाव आहे. जंबोरी मैदानात भाजपने ही दही हंडी आयोजित केली होती.

दोन वर्षांनी अत्यंत उत्साहाने आज दहीहंडीचा सण उत्साहाने साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवसभर विविध ठिकाणी भेटी दिल्या. अनेक ठिकाणी तारे तारकांनीही दहीहंडीच्या उत्सवांना हजेरी लावली होती. त्यांनी गोविंदांचा उत्साह वाढवला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in