मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणात ईडीने केली अटक

फोन टॅपिंग प्रकरणात ईडीने केली मोठी कारवाई, माजी पोलीस आयुक्त संजय पांडे अटकेत
Former mumbai Police Commissioner Sanjay pande Arrested by ED
Former mumbai Police Commissioner Sanjay pande Arrested by ED

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने ही कारवाई केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्यावर बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. ८ जुलैला सीबीआयने ही कारवाई केली होती. त्यापाठोपाठ आता ईडीने फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडे यांना अटक केली आहे.

संजय पांडे यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल

३० जूनला संजय पांडे हे सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ईडीने त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर चौकशीसाठीही बोलावलं होतं. आता सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण यांनी एक ऑडिट कंपनी स्थापन केली होती. २०१८ पासून ही कंपनी एनएसई स्कॅमचा तपास करत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत शेअर मार्केट कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीर पद्धतीने टॅप केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

काय आहे प्रकरण?

मनी लाँड्रींग प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नोटीस बजावली. त्यानंतर पोलीस दलात तसंच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय पांडे यांची मंगळवारी दिल्लीतल्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली.

संजय पांडे ३० जूनला निवृत्त झाले, त्यानंतर त्यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार सीबीआयने नॅशनल स्टॉक एक्सेंजच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण तसंच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात एनएसईच्या अधिकाऱ्यांचे फोन टॅप केल्याचा आरोपात गुन्हे दाखल केले आहेत.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणात मुंबई, पुणे आणि अन्य शहरातील दहा ठिकाणी छापे मारले आहेत. संजय पांडे यांच्याशी संबंधित मालमत्ता तपासल्या जात आहेत.

संजय पांडे यांनी २००१ एक आयटी ऑडिट कंपनी सुरू केली होती. त्या दरम्यान संजय पांडे यांनी दिलेला राजीनामा न स्वीकारला गेल्याने ते पुन्हा पोलीस दलात सेवेत रूजू झाले. या कंपनीत एका महिलेला आणि तिच्या मुलालाच संचालकपदी नेमलं गेलं. २०१० ते २०१५ या कालावधीत संजय पांडे यांच्या कंपनीला एनएसई सर्व्हर आणि सिस्टिमचे ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सीबीआयने नॅशनल स्टॉक एक्स्चेंज च्या घोटाळ्यात २०१८ मध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. आता त्यांना अटक करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in