धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू नेमका कसा झाला? आजही न सुटलेलं कोडं
धर्मवीर हे बिरूद ज्या नेत्याच्या नावापुढे लागलं तो एकमेव नेता म्हणजे आनंद दिघे. आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी आहे. आनंद दिघे यांचा मृत्यू आजच्याच दिवशी म्हणजेच २६ ऑगस्ट २००१ ला झाला. त्यांच्या मृत्यूला २१ वर्षे होऊन गेली आहेत तरीही त्यांचा मृत्यू अपघातामुळे झाला की तो घातपात होता हे कोडं अद्यापही कायम आहे. शिवसेना वाढवण्यात आणि […]
ADVERTISEMENT

धर्मवीर हे बिरूद ज्या नेत्याच्या नावापुढे लागलं तो एकमेव नेता म्हणजे आनंद दिघे. आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी आहे. आनंद दिघे यांचा मृत्यू आजच्याच दिवशी म्हणजेच २६ ऑगस्ट २००१ ला झाला. त्यांच्या मृत्यूला २१ वर्षे होऊन गेली आहेत तरीही त्यांचा मृत्यू अपघातामुळे झाला की तो घातपात होता हे कोडं अद्यापही कायम आहे.
शिवसेना वाढवण्यात आणि मोठी करण्यात आनंद दिघे यांचा सिंहाचा वाटा
ठाणे जिल्हा प्रमुख या पदावर असलेले आनंद दिघे यांनी शिवसेना वाढवली, मोठी केली. खेडेगावांपर्यंत शिवसेना नेली. शिवसेना गावागावांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये वाढवण्याचं श्रेय जातं ते त्यांनाच. आनंद दिघे यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली होती. इतकंच नाही तर आनंद दिघे हे ठाणेकरांसाठी देवच झाले होते. ठाण्यातल्या टेंभी नाका भागात त्यांचं प्रति न्यायालय भरत असे. त्यांचे किस्से आजही ठाण्यात सांगितले जातात.
बाळासाहेब ठाकरेंच्या एकदम जवळचे होते आनंद दिघे
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक आनंद दिघे होते. बाळासाहेब ठाकरे हे कायमच आनंद दिघे यांचं कौतुक करायचे. आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काम केलं होतं शिवसेना हा पक्ष ठाणे जिल्ह्यात मोठा करण्याचं श्रेय जातं ते आनंद दिघे यांनाच. बाळासाहेब ठाकरे हे आनंद दिघेंनी ठाण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहात असत. मग ते नवरात्र उत्सव असो किंवा इतर कुठलाही पक्षाचा कार्यक्रम. आनंद दिघे हे त्यांच्या विद्यार्थी दशेपासूनच शिवसेनेत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता.