Advertisement

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात चूक, आंध्र प्रदेशच्या खासदाराच्या पीएला घेतलं ताब्यात

गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबईत दौऱ्यावरती आले होते. यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत कुचराई झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
Amit Shah Mumbai visit
Amit Shah Mumbai visit Mumbai Tak

गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबईत दौऱ्यावरती आले होते. यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत कुचराई झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. अमित शाह यांच्याभोवती एक व्यक्ती बराच वेळ फिरत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्यक्ती आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचे सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी एका व्यक्तीला अटक केली आहे. ही व्यक्ती आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए आहे. मुंबईतील मलबार हिल येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यान तो संशयास्पदरित्या फिरत असल्याचा संशय होता.

गृहमंत्रालयाचा बँड हातात घातला होता

संबंधीत गोष्ट मंगळवारची आहे. जेव्हा हेमंत पवार गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा वर्तुळाच्या अगदी जवळ फिरताना दिसले. हेमंत पवार यांचे वय ३२ वर्षे आहे. त्यांच्या हातात गृहमंत्रालयाचा बँडही होता. तो बँड अधिकृत नव्हता. गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला. मात्र, ते धुळे येथील आपल्या घरी निघाले असताना पोलिसांना २४ तासांतच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

हेमंत पवार हे आंध्र प्रदेशच्या खासदाराचा पीए म्हणून काम करताता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यांच्याकडे संसदेचा पासही आहे. पण त्यांनी हातात घातलेला गृह मंत्रालयाचा बँड अधिकृत नव्हता आणि तो वापरल्याबद्दल त्यांना शिक्षा होऊ शकते. पोलिसांना असा संशय आहे की हेमंत यांना काही व्यक्तींना असे दाखवायचे होते की ते केंद्रीय नेत्यांना किती जवळ आहे.

बीएमसी निवडणुकीच्या निमित्ताने अमित शहांचा दौरा महत्त्वाचा

अमित शहा मंगळवारी मुंबईत पोहोचले. यादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सर्व खासदार, आमदार, एमएलसी आणि नगरसेवकांची बीएमसी निवडणुकीसंदर्भात बैठक घेतली. यावेळी अमित शहा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यापासून शिवसेनेच्या दाव्यावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा सुरू असतानाच अमित शहा यांचे हे वक्तव्य आले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in