मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, लोकल वाहतूक उशिराने, सखल भागात साठलं पाणी
मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सोमवारी रात्रीपासूनच पावासाच्या सरींवर सरी कोसळत आहेत. मागील काही तासांपासून कोसळधार सुरू आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. त्याचप्रमाणे हार्बर तसंच मध्य लोकल मार्गावरच्या लोकलही २० मिनिटं उशिराने धावत आहेत. धारावी कलानगर भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहण्यास मिळालं. प्रभादेवी स्टेशनच्या बाहेरील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर […]
ADVERTISEMENT

मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सोमवारी रात्रीपासूनच पावासाच्या सरींवर सरी कोसळत आहेत. मागील काही तासांपासून कोसळधार सुरू आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. त्याचप्रमाणे हार्बर तसंच मध्य लोकल मार्गावरच्या लोकलही २० मिनिटं उशिराने धावत आहेत.
धारावी कलानगर भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहण्यास मिळालं. प्रभादेवी स्टेशनच्या बाहेरील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं आहे. त्यामुळे या भागात ऑफिस असलेल्या लोकांचे हाल होत आहेत. त्याचप्रमाणे इतर अनेक भागांमध्येही हीच परिस्थिती आहे.
पश्चिम द्रुतगती मार्गावर पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहण्यास मिळालं. गोरेगाव ते गुंदवली या भागातही वाहनं चालवत असणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे.