पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात! असा आहे देहू, मुंबई दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन कार्यक्रमांनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरांचं लोकार्पण करण्यात येणार असून, त्यानंतर मुंबईत राज्यपालांच्या निवास्थानाच्या इमारतीचं उद्घाटन कार्यक्रम आहे. त्याचबरोबर मुंबई समाचारच्या कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार आहेत. आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार […]
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन कार्यक्रमांनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरांचं लोकार्पण करण्यात येणार असून, त्यानंतर मुंबईत राज्यपालांच्या निवास्थानाच्या इमारतीचं उद्घाटन कार्यक्रम आहे. त्याचबरोबर मुंबई समाचारच्या कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार आहेत.
आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्यापूर्वीच संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मोदी देहूमध्ये येणार आहेत.
मोदींच्या दौऱ्याआधी पगडीचा वाद! ऐनवेळी तुकोबारायांच्या अभंगाच्या ओळीच बदलल्या, कारण…
लोकार्पण कार्यक्रमासाठी देहू येथील मंदिर परिसरात सभामंडप उभारण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांचं संत तुकाराम पगडीने स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते विमानतळावरून देहूच्या दिशेने रवाना होतील.