SSC Result 2022: प्रतीक्षा संपली! आज दहावीचा निकाल, कुठे आणि कसा पाहाल

मुंबई तक

SSC 10th Result 2022 : बारावीच्या निकालानंतर आज दहावीचा निकाल लागणार आहे. याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे, दीर्घकाळ प्रतिक्षा केल्यानंतर आज दहावीच्या विद्यार्थांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज, 17 जून 2022 रोजी जाहीर करण्यात होणार आहे. आज दुपारी एक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

SSC 10th Result 2022 : बारावीच्या निकालानंतर आज दहावीचा निकाल लागणार आहे. याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे, दीर्घकाळ प्रतिक्षा केल्यानंतर आज दहावीच्या विद्यार्थांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज, 17 जून 2022 रोजी जाहीर करण्यात होणार आहे. आज दुपारी एक वाजता निकाल बोर्डाच्या वेबसाईटवरती विद्यार्थांना पाहता येणार आहे.

दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. मागच्या वर्षी दहावीच्या विद्यार्थांना कोरोनाचा सामना करावा लागला होता. परंतु यंदा विद्यार्थांनी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा दिली आहे. यामध्ये सुमारे 1,449,660 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दहावीचे वर्ष हे करीयरच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जाते, त्यामुळे या निकालाकडे (SSC Result) सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते की दहावीचा निकाल आज लागेल.

असा पाहा दहावीचा निकाल

स्टेप 1 : https://www.indiatoday.in/education-today/results वर लॉन ऑन करा
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा

हे वाचलं का?

    follow whatsapp