मुंबईत 30 वर्षांपासून फरार असलेल्या चोराच्या अखेर मुसक्या आवळल्या, अटकेसाठी पोलिसांनी नेमकं काय केलं?
Mumbai crime : मुंबई पोलिसांनी गेली 30 वर्षांपासून फरार झालेल्या चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. पाहिजे फरारी विशेष मोहिमेअंतर्गत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांना फरार असलेल्यांना गजाआड टाकण्यात यश मिळवलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
30 वर्षे फरार चोर अटकेत
अयोध्या आणि लखनऊ येथे शोधमोहिम
Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी गेली 30 वर्षांपासून फरार झालेल्या चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. पाहिजे फरारी विशेष मोहिमेअंतर्गत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांना फरार असलेल्यांना गजाआड टाकण्यात यश मिळवलं आहे. डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने यावर कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : पत्नीचं बाहेर लफडं सुरु असल्याचा पतीला संशय, क्रिकेटच्या बॅटनेच केला प्राणघातक हल्ला, महिलेला जागेवरच केलं ठार
30 वर्षे फरार चोर अटकेत
तर. पायधुनी पोलिसांनी मध्य प्रदेशातील खुनाच्या गुन्ह्यातील 7 वर्षापासून फरार आरोपीला पकडून मध्य प्रदेश पोलिसांना ताब्यात देण्यात आले आहे. डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाण्यातील दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात उत्तर प्रदेशचा चोर द्विजेंद्र कमलप्रसाद दुबे (वय 65) हा तब्बल 30 वर्षे फरार होता.
अयोध्या आणि लखनऊ येथे शोधमोहिम
पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपासाच्या आधारे 26 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या आणि लखनऊ येथे शोधमोहिम सुरु ठेवली होती. तेव्हा आरोपीला मुंबईतील ग्रँट रोड परिसरातून अटक केली होती.
हे ही वाचा : सांगलीत अग्नीतांडव! विटा शहरात तीन मजली इमारतीला आगडोंब, एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून अंत
पायधुनी पोलिसांनी मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील बरही पोलीस ठाण्यातील दाखल करण्यात आलेल्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी राजाराम रामधार तिवारी (वय 35) याच्याही मुंबईतून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.










