मुंबई : गेटवेजवळ बोट बिघडली, 38 प्रवाशांचा जीव टांगणीला.., काय घडलं?

मुंबई तक

Mumbai gateway of india incident : गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात ‘अनवारी’ फेरीचे इंजिन अचानक खराब झाल्याने 34 प्रवासी आणि चार चालक दलाचे सदस्य अडकले. पोलिसांच्या मदतीने ‘आजाद हिंद’ बोटीने फेरीला सुरक्षितपणे जेट्टीवर आणत सर्व 38 जणांचा बचाव केला.

ADVERTISEMENT

Mumbai gateway of india incident
Mumbai gateway of india incident
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबई : गेटवेजवळ बोट बिघडली,

point

38 प्रवाशांचा जीव टांगणीला.., काय घडलं?

Mumbai gateway of india incident : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ गुरुवारी रात्री समुद्रात बोट अचानक बिघडली. इंजिन अचानक बंद पडल्याने 34 प्रवाशांसह चार चालक दलाच्या लोकांचा जीव टांगणीला लागला होता.  गुरुवारी रात्री सुमारे 8.30 वाजता ही घटना घडली. ‘अनवारी’ नावाची बोट समुद्री सफरीसाठी प्रवाशांना घेऊन गेली होती.

हेही वाचा : Center Point | विद्यानंद बापट, संतोष पंडित यांना भूमिका मांडल्याची किंमत मोजावी लागतेय?

समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 1.5 नॉटिकल माइल अंतरावर इंजिन अचानक खराब

सुमारे अर्ध्या तासाची समुद्री सफर पूर्ण करून गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने परतत असताना समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 1.5 नॉटिकल माइल अंतरावर इंजिन अचानक खराब झाले. या बोटमध्ये एकूण 38 जण होते. त्यात 34 प्रवासी आणि चार चालक दलाचे सदस्य होते. इंजिन बंद पडल्याने फेरी समुद्रातच अडकली आणि मदत मिळेपर्यंत प्रवाशांची धाकधूक वाढली.

हेही वाचा : रत्नागिरीहून आलेल्या बापटांनी पुणेकरांना शिकवू नये, ठोंबरेंची पोस्ट, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस