मुंबईची खबर: विषय गंभीर... BMC च्या 'एवढ्या' मराठी शाळा पडल्या बंद, अवस्था बिकट!
महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 45 टक्क्यांनी कमी झाली असून शाळेतील शिक्षकांची संख्या कमी होत असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई महापालिकेच्या शाळांच्या संख्येत घट
गेल्या 13 वर्षातील मराठी शाळा आणि त्यातील शिक्षकांची आकडेवारी
मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत 45 टक्क्यांनी घट
Mumbai News: मुंबईसोबत राज्यातील बऱ्याच शहरांमध्ये मराठी शाळांची संख्या कमी होत असल्याचं वास्तव पाहायला मिळतंय. दिवसेंदिवस मराठी शाळांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात असताना याबद्दल निराशाजनक परिणाम समोर येत आहेत.
13 वर्षातील महापालिकेच्या शाळांची आकडेवारी
अशातच, 13 वर्षात मुंबई महापालिकेच्या 131 शाळा बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त, महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 45 टक्क्यांनी कमी झाली असून शाळेतील शिक्षकांची संख्या कमी होत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. 2012-13 ते 2024-25 या 13 वर्षातील मराठी शाळांची संख्या आणि त्यात शिकणाऱ्या विद्यार्थी तसेच शिक्षकांची संख्येत घट झाल्याचं निदर्शनास येत आहे.
एकीकडे मराठी शाळा आणि मराठी भाषा संवर्धनासाठी बरेच उपक्रम राबवले जातात तर दुसरीकडे आपल्या पाल्याला मराठीऐवजी इंग्रजी शाळेत शिकवण्याचा अट्टाहास पाहायला मिळतो.
हे ही वाचा: जावई सासूसोबत नाही तर तिच्या 'सुनेसोबत' गेला पळून, बायकोला म्हणाला, तुझी वहिनी जरा जास्तच...
शिक्षणतज्ज्ञांचं मत
शिक्षणतज्ज्ञांच्या मते, मराठीचं राजकारण करणाऱ्यांनी मराठी शाळा टिकवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. तसेच, महापालिकेने मराठी शाळा टिकवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नसल्याकारणाने ही शैक्षणिक बाब नसून राजकीय प्रश्न असल्याचं यावरुन स्पष्ट होत आहे.










