मुंबईकरांनो सावधान... पुढच्या 5 दिवसात सलग येणार समुद्राला मोठी भरती, तुफान पाऊस बरसला तर...

मुंबई तक

मुंबईतील समुद्रात पुढचे पाच दिवस सलग मोठी भरती येणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने याबाबत अलर्ट जारी करून नागरिकांना सावध केलं आहे.

ADVERTISEMENT

पुढच्या 5 दिवसात सलग येणार समुद्राला मोठी भरती! (फोटो सौजन्य: Grok)
पुढच्या 5 दिवसात सलग येणार समुद्राला मोठी भरती! (फोटो सौजन्य: Grok)
Google CTA

बातम्या हायलाइट

point

२४ ते २८ जून दरम्यान सलग ५ दिवस मोठी भरती

point

तर यंदाच्या पावसाळ्यात १९ वेळा समुद्राला येणार मोठी भरती !

point

मोठ्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन

मुंबई: मान्सून सध्या सक्रीय झाला असून आता लवकरच मुसळधार पावसाला सुरुवात होईल. त्यातही मुंबईत पावसासोबत समुद्राची उधाणाची भरती ही अत्यंत महत्त्वाची ठरते. आता याचबाबत नेमकी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. 24 जूनपासून ते 28 जून 2025 पर्यंत असे सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. तर यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीदरम्यान 19 वेळा समुद्राला मोठी भरती असणार आहे. 

मोठी भरती याचा अर्थ सदर भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या पावसाळ्यातील मोठ्या भरतीचा तपशील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे.

हे ही वाचा>> Video: महाबळेश्वर, साताऱ्यात तुफान पाऊस, वेण्णा लेक ओव्हरफ्लो.. ही दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी!

यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा दिनांक 26 जून 2025 रोजी उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्या नजीक जावू नये, तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना पुन्हा एकदा करण्यात येत आहे. 

वरीलनुसार यंदाच्या पावसाळ्या दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे कळविण्यात आलेला मोठ्या भरतीचा तपशील खालीलप्रमाणेः- 

जून 2025

तारीख वेळ

लाटांची उंची