Sindhudurga: कुडाळमध्ये का तैनात केलंय दंगल नियंत्रण पथक?
भरत केसरकर, कुडाळ Maharashtra-Karnataka Border Dispute: बेळगावमधील हिरे बागेवाडी टोलनाक्याजवळ काल (6 डिसेंबर) कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या. महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावमधील मराठी भाषिकांना भेटण्यास विरोध आणि महाराष्ट्र पासिंग गाड्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकात फोडल्या. त्याचे पडसाद काल सायंकाळी उशिरा सिंधुदुर्गातही उमटले आहेत. (why has […]
ADVERTISEMENT

भरत केसरकर, कुडाळ
Maharashtra-Karnataka Border Dispute: बेळगावमधील हिरे बागेवाडी टोलनाक्याजवळ काल (6 डिसेंबर) कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या. महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावमधील मराठी भाषिकांना भेटण्यास विरोध आणि महाराष्ट्र पासिंग गाड्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकात फोडल्या. त्याचे पडसाद काल सायंकाळी उशिरा सिंधुदुर्गातही उमटले आहेत. (why has the riot control team been deployed in kudal maharashtra karnataka border dispute)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील एसटी डेपोत थांबलेल्या बेळगाव-कुडाळ या कर्नाटक बसवर मनसैनिकांनी ”जय महाराष्ट्र, जय मराठी” अशी अक्षरे रंगवून आपला निषेध नोंदवला होता. यावेळी हा फक्त निषेध व्यक्त केला असून परिस्थिती जर सुधारली नाही तर कर्नाटक पासिंग गाड्या जिल्ह्यात फिरु देणार नाही असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
त्यामुळे आज सकाळी कुडाळहून बेळगावकडे जाणारी कर्नाटक बस मार्गस्थ झाली नाही. ही बस कुडाळ डेपोत उभी असून येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आले आहे.










