Nashik MLC Election : मुलासाठी ‘त्याग’! सुधीर तांबेंनी का घेतली माघार?
नाशिक पदवीधर मतदारसंघात (nashik graduate constituency election 2023) उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मोठा उलटफेर बघायला मिळाला. काँग्रेसनं (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe)यांना एबी फॉर्म (AB Form) दिला होता, मात्र ऐनवेळी त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे (satyajeet Tambe) यांनी अपक्ष (independent) म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक निवडणुकीच्या (Nashik Election) निमित्ताने काँग्रेसमधील (congress) गोंधळ पुन्हा एकदा […]
ADVERTISEMENT

नाशिक पदवीधर मतदारसंघात (nashik graduate constituency election 2023) उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मोठा उलटफेर बघायला मिळाला. काँग्रेसनं (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe)यांना एबी फॉर्म (AB Form) दिला होता, मात्र ऐनवेळी त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे (satyajeet Tambe) यांनी अपक्ष (independent) म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक निवडणुकीच्या (Nashik Election) निमित्ताने काँग्रेसमधील (congress) गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. महत्त्वाचं म्हणजे सुधीर तांबेंनी माघार का घेतली याचीही चर्चा होतेय. याबद्दल त्यांनीच भूमिका मांडलीये.
सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुधीर तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुधीर तांबे म्हणाले, ‘काँग्रेस पक्षातर्फे मी नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो आहे. पहिल्या वेळेस मी अपक्ष होतो. पदवीधर मतदारसंघ हा विधान परिषदेचा वेगळा मतदारसंघ आहे.”
विधान परिषद निवडणूक 2023 : माघार घेताना सुधीर तांबे काय म्हणाले?
सुधीर तांबे असंही म्हणाले की, ‘घटनेमध्ये आपल्या समाजातील जे पदवीधर आहेत त्यांना एक विशेष हक्क घटनेने प्रदान केला आहे. तेव्हा अशा बुद्धीवंत वर्गाचं.. ज्यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक आहेत याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील जे पदवीधर आहेत. अशा सुज्ञ लोकांचं प्रतिनिधित्व मला करण्यास मिळालं आहे 13 वर्ष. मी खूप काम केलं आहे या सर्व लोकांसाठी. पदवीधर मतदारसंघाला एक वेगळा आयाम देण्याचा मी प्रयत्न केला.”
नाशिकच्या हायव्होल्टेज ड्राम्यात विखे पाटलांची एन्ट्री : तांबेंच्या पाठिंब्यावर मोठं भाष्य