Kasba Peth Bypoll : ‘ईव्हीएम’चा फोटो केला शेअर! रुपाली ठोंबरेंवर कारवाई होणार?
Kasba Peth by election 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरेंनी पुन्हा एक वाद ओढवून घेतला आहे. कसबा पेठ मतदारसंघात मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी गेलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मतदान करतानाचा ईव्हीएमचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मतदान होतंय. कसब्यात रवींद्र धंगेकर, हेमंत रासने आणि आनंद दवे यांच्यात लढत होत आहे. […]
ADVERTISEMENT

Kasba Peth by election 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरेंनी पुन्हा एक वाद ओढवून घेतला आहे. कसबा पेठ मतदारसंघात मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी गेलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मतदान करतानाचा ईव्हीएमचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.
कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मतदान होतंय. कसब्यात रवींद्र धंगेकर, हेमंत रासने आणि आनंद दवे यांच्यात लढत होत आहे. पण, याच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्याकडून निवडणूक आचार संहितेचा भंग झाला आहे.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी कसबा मतदारसंघात मतदान करण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. त्यांनी शेअर केलेल्या फोटोत मतदार मतदान करत असून, कोणत्या उमेदवाराला मत दिले, हे त्यात स्पष्ट दिसत आहे. ईव्हीएमवरील कोणतं बटन दाबलं, हे त्यांच्या फोटोत स्पष्ट दिसत आहे. हाच फोटो रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.
chinchwad-kasba Peth bypolls Live : चिंचवडमध्ये 3.52 टक्के, कसब्यात 6.5 टक्के मतदान