डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला नऊ वर्षे पूर्ण, आत्तापर्यंत काय काय घडलं?
२० ऑगस्ट २०१३ या दिवसाची सकाळ उजाडली ती अत्यंत वाईट बातमीने. पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर बाईकवरून आलेल्यां हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. आज या दुर्दैवी घटनेना नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. पाच जणांवर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा आरोप डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची […]
ADVERTISEMENT

२० ऑगस्ट २०१३ या दिवसाची सकाळ उजाडली ती अत्यंत वाईट बातमीने. पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर बाईकवरून आलेल्यां हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. आज या दुर्दैवी घटनेना नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत.
पाच जणांवर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा आरोप
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर सुरू आहे. मागच्या नऊ वर्षात पाच आरोपींवर आरोप निश्चिती झाली आहे. या सगळ्या आरोपींच्या विरोधात UAPA अॅक्ट अंतर्गत खटला चालवला जावा अशी मागणी CBI ने होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी कोण?
विरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. सचिन पुनाळेकर आणि विक्रम भावे हे पाच आरोपी या प्रकरणातले आहेत.
२० ऑगस्ट २०१३ ला नेमकी घटना काय घडली होती?
२० ऑगस्ट २०१३ या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्या झाली त्यावेळी शिंदे पुलावर सफार्इ करणारा एक पुरुष आणि महिला पुलाच्या दुभाजकावर बसले होते. त्यावेळी जवळच्या एका झाडावर माकड आल्याने आवाज झाला. तसेच कावळ्यांचा आवाज देखील येऊ लागल्याने या दोघांनी त्या दिशेला पाहिले. त्याच वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर दाभोलकर काही क्षणात खाली कोसळली. त्यानंतर हे हल्लेखोर जवळच असलेल्या पोलीस चौकीच्या बाजूला पळाले आणि दुचाकीवरून पळून गेले.