Palghar: जीव टांगणीला! धोकादायक प्रवाहातून वृद्धेला डोली करून रूग्णालयात न्यायची वेळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पालघर – जव्हार तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भाटीपाडा येथील एका 62 वर्षीय वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी लाकूड आणि चादरी पासून तयार केलेल्या डोलीचा आधार घ्यावा लागला आहे . या वृद्ध महिलेच्या कुटुंबीयांना महिलेला डोलीत घेऊन तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी असून धक्कादायक बाब म्हणजे ही पायपीट करताना या तरुणांना नदीच्या धोकादायक वाहत्या प्रवाहातून वाट काढावी लागली .

पालघरमधल्या वृद्ध महिलेचा उपचारांसाठी डोलीतून धोकादायक प्रवास

६२ वर्षांच्या एका वृद्ध महिलेला उपचारांसाठी डोली करून नेण्यात आलं. रूग्णालय गाठण्यासाठी या महिलेच्या कुटुंबीयांना धोकादायक प्रवाह असलेली नदी ओलांडावी लागली. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे . त्यामुळे पालघर मधील जव्हार,मोखाडा तसंच विक्रमगड या भागात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला पुन्हा एकदा उघड झाला आहे .

जव्हारच्या भाटीपाडा गावातील वृद्ध महिलेला उपचारांसाठी नदी पार करून न्यावं लागलं रूग्णालयात

जव्हार तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भाटीपाडा येथील 62 वर्षीय वृद्ध महिला लक्ष्मी घाटाल यांच्या पायाला जखम झाल्याने सूज आली होती . असह्य होणाऱ्या वेदनांमुळे या वृद्ध महिलेला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला . मात्र गावापर्यंत येण्यासाठी रस्ताच नसल्याने महिलेला लाकूड आणि चादरी पासून तयार केलेल्या डोलीत घेऊन तिच्या कुटुंबीयांना पायपीट करावी लागली आहे .

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विशेष म्हणजे भाटीपाडा ते जव्हार जाण्यासाठी काळदेवी नदी पार करावी लागत असून या नदीत पाण्याचा प्रवाह ही धोकादायक होता . मात्र जीव धोक्यात घालून लक्ष्मी घाटाळ यांच्या कुटुंबियांनी नदीतील शंभर मीटरच नदीपात्र वाहत्या पाण्यातून पार करत वृद्ध महिलेला जव्हार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

भाटीपाडा या गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसून ह्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे . मात्र वन विभागाच कारण देत जिल्हा प्रशासन अजूनही या गावाला जोडणारा मुख्य रस्ता तसंच काळदेवी नदीवरील पूल तयार करत नाहीये . त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून या विरोधात ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय .

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT