Pune Loksabha : काँग्रेसच्या जागेवरच राष्ट्रवादीचा ‘डोळा’; पुण्यात नवं राजकारण

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

ncp leader prashant jagtap tweet about congress pune lok sabha constituency
ncp leader prashant jagtap tweet about congress pune lok sabha constituency
social share
google news

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं २९ मार्चला दीर्घ आजाराने निधन झालं. गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चा होण्यामागे दोन तीन घटना महत्त्वाच्या ठरल्या. बापट गेल्यानंतर दोन ते तीन दिवसातच केलेल्या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण झाला होता. पुण्याची जागा भाजपच्या विरोधात काँग्रेस लढत असताना आता जयंत पाटील आणि प्रशांत जगताप यांच्या वक्तव्यांमुळे नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नेमकं पुण्याच्या लोकसभेवरुन काय राजकारण रंगतंय हेच आपण समजावून घेऊयात…

सुरुवातीला आत्तापर्यंत काय घडलंय आणि कसं राजकारण रंगलंय ते समजावून घेऊयात…

पुण्याचे खासदार गिरीश बापट गेल्या वर्षभरापासून आजाराशी झुंज देत होते. २९ मार्चला उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर दोनच दिवसात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्याच्या लोकसभेच्या जागेबाबत वक्तव्य केलं. पुण्याती लोकसभेची जागा महाविकास आघाडी लढेल असं ते म्हणाले. त्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. पवारांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करुन दिली होती.

हे सगळं होत असताना भाजपचे पुण्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या एका फ्लेक्समुळे पुन्हा वाद निर्माण झाला होता. जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या एका फ्लेक्सवर पुण्याचे भावी खासदार असा त्यांच्या उल्लेख करण्यात आला होता. त्यांच्या या फ्लेक्समुळे त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका झाली. त्यानंतर मुळीक यांनी त्यावर स्पष्टीकरण देखील दिलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक दावेदारीच्या शर्यतीत

गिरीश बापट यांच्या जाण्यामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. जर बापट कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी देण्यात आली तर ही निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी या जागेसाठी भाजपमध्येच अनेक दावेदार आहेत. बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी त्याचबरोबर शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे दावेदारीच्या शर्यतीत आहेत.

दुसरीकडे काँग्रेसकडून देखील उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. पुण्याची लोकसभेची जागा आघाडीमध्ये काँग्रेसकडे आहे. त्यामुळे काँग्रेस या जागेवर दावा सांगण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वक्तव्यांमुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शरद पवार-उद्धव ठाकरेंची भेट; संजय राऊतांनी सांगितलं बैठकीत काय घडलं?

बापट यांच्या निधनानंतर सर्व धार्मिक विधी होईपर्यंत निवडणुकीविषयी न बोलण्याचं राष्ट्रवादीने ठरवलं आहे. परंतु सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर पुण्याची जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी देखील ते आग्रही आहे. अर्थात या सगळ्या शक्यता आहेत. सध्या ही जागा काँग्रेसकडे आहे परंतु पक्षाला मी जर या जागेसाठी योग्य उमेदवार वाटत असेल तर मला ही जागा लढवायला आवडेल, असं वक्तव्य प्रशांत जगताप यांनी एका व्हिडीओमध्ये केलं होतं.

ADVERTISEMENT

पुणे लोकसभा निवडणूक : जयंत पाटील काय म्हणाले?

याच मुद्द्यावर जयंत पाटलांनी देखील वक्तव्य केलं. ‘प्रशांत जगतापांनी पुण्याची लोकसभेची जागा लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. प्रशांत जगताप हे पक्षाचे मेहनती कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांना वाटतं की त्यांना तिकीट मिळायला हवं. अर्थात निवडणुकीला वेळ आहे आणि बापटांच्या निधनानंतर लगेच यावर चर्चा करायची नाही असं आमच्या पक्षाने ठरवलं आहे’, असं पाटील म्हणाले.

हेही वाचा >> MSC Bank scam case : ईडीने अजित पवार, सुनेत्रा पवारांची नावं आरोपपत्रातून वगळली -सूत्र

त्यामुळे जरी पुण्याची लोकसभेची पोटनिवडणुक जाहीर झाली नसली तरी त्याबाबतच्या चर्चा मोठ्याप्रमाणावर सुरु झाल्या आहेत. आता राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेवर दावा केला तर काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. पुण्याच्या लोकसभेच्या जागेवरुन आघाडीत बिघाडी देखील होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला या जागेसाठी योग्य उमेदवार न मिळाल्यास राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात यात काय राजकारण होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT