PUNE: ‘तो’ देवदूतच… कोयत्याचा वार झेलला, तरुणीला जीवदान देणारा लेशपाल जवळगे आहे तरी कोण?

मुंबई तक

पुण्यातील सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. मात्र, याच वेळी MPSC ची तयारी करणारा मुलगा हा तरुणीसाठी देवदूत ठरला. कारण त्याच्या एका कृतीमुळे तरुणीचा जीव वाचला.

ADVERTISEMENT

pune sadashiv peth youth scythe attack college girl life saved mpsc student leshpal javalge crime news
pune sadashiv peth youth scythe attack college girl life saved mpsc student leshpal javalge crime news
social share
google news

Pune MPSC Student: पुणे: पुण्यातील (Pune) मध्यवर्ती अशा सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) एका 18 वर्षीय तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अगदी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास हा भयंकर प्रकार भररस्त्यात सुरू होता. कॉलेजवयीन तरूणी बोलत नसल्याच्या रागातून तिच्या वर्गातील मुलाने हे भयंकर कृत्य केल्याचं समोर आलं. खरं तर तरुणीचा जीव घ्यायचा याच उद्देशाने तरूणाने तिच्यावर हल्ला चढवला होता. मात्र, MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या एका मुलाने अगदी मोक्याच्या क्षणी धावत जात तरुणीचा जीव वाचवला. (pune sadashiv peth youth scythe attack college girl life saved mpsc student leshpal javalge crime news)

तरुणी आपल्याशी बोलत नाही. आपल्या प्रेमाचा स्वीकार करत नाही. पण दुसऱ्या तरुणासोबत फिरते याच रागातून आरोपी शंतनू याने तिला रस्त्यात गाठून थेट तिच्यावर आणि तिच्यासोबत असणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला चढवला. खरं तर एक क्षण जरी उशीर झाला असता तर तरुणीचा जीवच गेला असता. पण त्याचवेळी लेशपाल जवळगे नावाच्या एका MPSC च्या विद्यार्थ्याने आरोपी शंतनूचा वार अगदी वरच्या वर झेलला. एवढंच नव्हे तर समयसूचकता दाखवत त्याने कोयता हातातून काढून घेतला. यावेळी आणखी एका मुलाने आरोपी शंतनूला मागून पकडलं. अगदी क्षणार्धात घडलेल्या घटनेमुळे आज एका तरुणीचा जीव वाचला. त्यामुळे लेशपाल आज हा खऱ्या अर्थाने तरुणीसाठी देवदूत ठरला आहे.

लेशपालने कसं वाचवले तरुणीचे प्राण?

या घटनेनंतर लेशपाल याने माध्यमांशी संवाद साधताना या घटनेबाबत नेमकी माहिती दिली.’मी पहिल्यांदा अभ्यासिकेत येत होतो.. आज तसा मला थोडा उशीरच झाला होता. इकडून ती मुलगी धावत येत होती. पहिल्यांदा इथे तिच्यावर वार बसला.. कोयता बघून लोकं सगळे पांगले बाजूला.. ही खूप मोठी सामाजिक विकृती आहे ही. कोणीच पकडायला येत नव्हतं. का तर त्याच्या हातात कोयता होता. मुलगा काय खूप मोठा नव्हता किंवा धाडसी नव्हता. फक्त त्याच्या हातातील हत्यार बघून लोक पांगत होते. बघ्याची भूमिका घेत होते. मुलगी खूप ओरडत-ओरडत पलीकडे आली. मी तिकडे उभा होतो. मी बघितलं मुलगी धावताना… पहिल्यांदा तो मुलगा मला दिसला नाही. मुलगी पुढे गेल्यावर मी पाहिलं तर हा मुलगा कोयता घेऊन तिच्या मागे पळत होता.’

‘मी लगेच बॅग टाकली. तोपर्यंत तो मुलगा कोयता घेऊन तिच्यामागे पळत होता. तोपर्यंत तो तिच्यापर्यंत पोहचला. ती त्या बेकरीच्या इथे खाली बसली स्वत:ला वाचवा म्हणवत. हा कोयत्याने जोरदार तिच्यावर वार करणार होताच. तेवढ्यात मी तिथवर पोहचलोच. त्याचा कोयता वरच्यावर पकडला. नंतर एक मुलगा माझ्या मदतीला पण आला. आम्ही त्याला पकडून पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन गेलो.’

हे वाचलं का?

    follow whatsapp