इंदापूर : महिलेच्या पोटात बाळ, 'त्या' कारणावरून पतीकडून पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करत संपवलं, मृतदेहावरील टॅटूने...

मुंबई तक

Indapur Crime : इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावाला लागून असलेल्या पुलाच्या पाण्यात एका गर्भवती महिलेचा मृतदेह आढळला. याच प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालत तपास केला असता, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

Indapur crime
Indapur crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावात पुलाच्या पाण्यात गर्भवती महिलेचा मृतदेह

point

पतीनेच केली होती 'त्या' कारणावरून हत्या

Indapur Crime : इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावाला लागून असलेल्या पुलाच्या पाण्यात एका गर्भवती महिलेचा मृतदेह आढळला. याच प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालत तपास केला असता, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. पतीने आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय व्यक्त केला. याच संशयातून महिलेच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि मृतदेह पाण्यात फेकला. हा धक्कादायक प्रकार हा बारामती तालुक्यातील कटफळ येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : चला पुण्याला म्हणत पहाटे साडे तीन वाजता लिफ्ट दिली, रस्त्यात गाडी थांबवून महिलेला झाडीत नेलं, नको तेच... लाज आणणारी घटना

पतीने गर्भवती पत्नीवर केले वार 

मृत महिलेचे नाव दीपाली सुदर्शन जाधव (वय 30) असे आहे. तसेच आरोपी पतीचं नाव सुदर्शन उर्फ ​​रविराज रणजीत जाधव (वय  36) याने तिच्या हत्येची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी रविराजला 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महिलेच्या पोटात वाढणाऱ्या बाळावरून दोघांमध्ये 12 ऑक्टोबर रोजी कटफळ येथील राहत्या घरात वाद झाला. हा वाद इतका वाढत गेता की, सुदर्शनने पत्नी दीपालीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. 

'त्या' टॅटूवरून घटनेचा सत्य समोर 

रविराजने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह एका चादरीत गुंडाळला आणि मदनवाडी येथील पुलाच्या पाण्यात फेकून दिला होता. त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला होता. तपास करताना महिलेच्या हातावर रविराज नावाचे टॅटू आढळून आले होते. या प्रकरणाचा तपास भिगवण पोलिसांनी केले असता, मृत महिलेचा फोटो जवळच्या पोलीस ठाण्यात पाठवला. हातावरील टॅटू हाच एक पुरावा असं समजून पोलिसांनी रविराजचा शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा पोलिसांनी भलताच संशय आला होता. 

हे ही वाचा : मोठी बातमी: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण; आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसांना शरण...

टॅटूवरून पोलिसांनी सुदर्शन जाधवची चौकशी केली. तेव्हा पोलिसांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला होता. प्रकरणाच्या एकूण चौकशीनंतर आरोपीने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. पोलिसांनी संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp