पुणे : बालाजी नगर गोळीबार प्रकरणात आंदेकर टोळीतील चौघांना उचललं, 12 जणांविरोधात गुन्हा दाखल
Pune balajinagar firing case : पुण्यातील बालाजीनगर परिसरात वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीचा भाऊ अक्षय उर्फ बाळा म्हस्के याच्यावर आंदेकर टोळीच्या नावाने भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : बालाजी नगर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी चौघांना उचललं
12 जणांविरोधात गुन्हा दाखल
Pune balajinagar firing case : : पुणे शहरातील गुन्हेगारी आणि टोळी संघर्ष पुन्हा एकदा अत्यंत भीषण रित्या समोर आला असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणानंतर सुरू असलेली वैराची मालिका अद्याप थांबलेली नाही. शहरातील बालाजीनगर परिसरात बुधवारी (दि.20) सकाळी भरदिवसा अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के (वय 26) या रिक्षाचालकावर आंदेकर टोळीच्या नावाने गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या थरारक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी निधेश विंचुरकर, वेदांत टेमगिरे, आवेज शेख, ऋषी आंबट या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
हेही वाचा : मध्यरात्री काकीच्या बेडरूममध्ये शिरला अन् पुतण्याने... 'नको तो प्रकार' बरोबर कॅमेऱ्यात झाला कैद
बालाजी नगर गोळीबार प्रकरणात 12 जणांविरोधात गुन्हा दाखल
या गंभीर प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात कृष्णा आंदेकर, बंडु आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमित बहादुरकर, स्वप्नील बहादुरकर यांच्यासह निधेश विंचुरकर, वेदांत टेमगिरे, आवेज शेख, ऋषी आंबट, लाला उर्फ अमन आणि अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जखमी रिक्षाचालक अक्षय मस्के यांच्या पत्नी करुणा मस्के यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के (वय २६, रा. आंबेगाव पठार) हा युवक गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर सध्या भारती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे. जखमी अक्षय म्हस्के याला एक लहान मुलगी असल्याचेही समोर आले आहे.
हेही वाचा : मध्यरात्री काकीच्या बेडरूममध्ये शिरला अन् पुतण्याने... 'नको तो प्रकार' बरोबर कॅमेऱ्यात झाला कैद









