Pune : भाऊ, दादा, नेते, मंत्री... पुण्यात सगळीकडे होर्डिंग्सची गर्दी! संतापलेले नागरिक म्हणाले...

मुंबई तक

Pune News : शहरात लागलेल्या बॅनर्सच्या गर्दीमुळे पुणेकरांमध्ये पुन्हा संताप निर्माण झाला आहे. पुुण्यातल्या आमदार, खासदार, मंत्र्यांना टॅग करुन पुणेकरांनी नेमकं काय म्हटलंय, ते पाहू...

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात चौका-चौकात बॅनर्सची गर्दी

point

सिग्नल झाकले, झाडंही लपले...

point

पुणे महापालिका कारवाई करणार का?

Pune News : भाऊ, दादा, आमदार, खासदार, नेते, कार्यकर्ते यांच्या अभिनंदनाचे, शुभेच्छा देण्यासाठी लागलेले कित्येक बॅनर्स पुण्यात दिसतात. या बॅनर्सला कंटाळून लोकांनी अनेकदा संताप व्यक्त केला आहे. नागरिकांच्या या भावना लक्षात घेऊन, पुण्यातील राजकारण्यांनीही शहराचं विद्रूपीकरण करणाऱ्या बेकायदेशीर बॅनरविरुद्ध वारंवार आवाज उठवला आहे. अलीकडेच, नवनिर्वाचित कसबा पेठेचे आमदार हेमंत रासने यांनी त्यांचा मतदारसंघ होर्डिंगमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी हा संकल्प करत शनिवार पेठेतील एक अनधिकृत बॅनर स्वतःहून काढून टाकला होता. मात्र, तरीही चित्र बदलेलं दिसत नाही. फ्री प्रेस जर्नल या वृत्त समुहाने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री झाले. त्यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या समर्थकांना अभिनंदन करणारे कोणतेही बॅनर लावू नयेत असं आवाहन केलं होतं. मात्र, त्यांच्या आवाहनाचं पालन कुणीही केलेलं दिसत नाही.

हे ही वाचा >> Aurangzeb Tomb : "औरंगजेबाची कबर उखडा", विहिंपचा इशारा; 'कारसेवा करणार' म्हणजे नेमकं काय?

सध्या शहरात लागलेल्या बॅनर्सच्या गर्दीमुळे पुणेकरांमध्ये पुन्हा संताप निर्माण झाला आहे. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, कोथरुडचे आमदार आणि महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि पर्वतीच्या आमदार आणि महाराष्ट्राच्या मंत्री माधुरी मिसाळ यांना टॅग करून सोशल मिडिया युजर्सनी पुन्हा या मुद्द्यावरुन सवाल केले आहेत.

"पुण्यातील सर्व बेकायदेशीर होर्डिंग्ज हटवा. बालभारती चौकात 12 हून अधिक होर्डिंग्ज आहेत. एसबी रोड, बाणेर मेन रोड, कॅम्प इत्यादी ठिकाणी हजारो होर्डिंग्ज लावलेले असतात" असं काहींनी म्हटलंय.  तर काहींनी म्हटलंय, तुम्ही "पुण्याला बदनाम करत आहात. तसं कायदा, पर्यावरण आणि आमच्या मतांची थट्टा करत आहात. @PMCPune देखील फार काही करू शकत नाही." 

काही लोकांनी म्हटलंय, "हे राजकारणी फक्त भाषणं देतील. पण त्यानुसार वागणार नाहीत. जेव्हा आम्ही हे त्यांच्या लक्षात आणून देतो तेव्हा ते म्हणतात, आम्ही काय करू? 'कार्यकर्ते' आमचं ऐकत नाहीत." तर, हे राजकारणी अशा गोष्टींसाठी भुकेले आहेत असंही काहीजण म्हटले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp