पुणे हादरलं, फिल्टरच्या विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई तक

Pune news : खानावळीत फिल्टरच्या विजेच्या धक्क्याने पुण्यातील शिवाजीनगर कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं संबंधित परिसर हादरून गेला आहे.

ADVERTISEMENT

Pune news
Pune news
google news

बातम्या हायलाइट

point

शिवाजीनगर कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

point

तरुण 'ई-मेस'कमिटी मेंबर म्हणून कार्यरत होता

Pune news : आदित्य भावार - खानावळीत फिल्टरच्या विजेच्या धक्क्याने पुण्यातील शिवाजीनगर कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं संबंधित परिसर हादरून गेला आहे. मृत पावलेल्या तरुणाचे नाव चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय 23, रा. डोंगरगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे आहे. 

हे ही वाचा : Maharashtra weather : राज्यात अस्मानी संकट, 'या' 4 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस घालणार थैमान

ही घटना 14 तालखेला रात्री घडली होती, त्यानंतर त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान मंगळवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान, मृत तरुण हा चैतन्य हा कृषी महाविद्यालयातील 2021-25 वर्षातील विद्यार्थी होता. 

'ई-मेस'कमिटी मेंबर म्हणून कार्यरत होता तरुण

सध्या तो अ‍ॅग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंटच्या प्रथम वर्षात बिझनेस मॅनेजमेंटच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. महाविद्यालयीन काळात तो 'ई-मेस'कमिटी मेंबर म्हणून कार्यरत होता. मेसची व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी तो नेहमीच पुढाकार घ्यायचा. संबंधित प्रकरणात माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल फोन बंद होता व ते कॉलेजमध्ये ही उपस्थित नव्हते. 

हे ही वाचा : भोंदूबाबा खरातसोबतची 'ती' डील तरीही उपजिल्हाधिकारी भांडे-पाटलांची क्रीम खात्यात बदली!

तरुणाच्या मृत्यूनं विद्यार्थ्यांमध्ये चिंतेची बाब

या घटनेनं विद्यार्थ्यांमध्ये चिंतेची बाब निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शांततापूर्ण आंदोलनास सुरुवात केली आहे. चैतन्यला न्याय मिळावा, तसेच भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. 

हे वाचलं का?