Maharashtra weather : राज्यात अस्मानी संकट, 'या' 4 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस घालणार थैमान

मुंबई तक

Maharashtra weather : पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. अशातच जाणून घेऊयात 25 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra weather
Maharashtra weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'या' जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो

point

जाणून घेऊयात 25 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather : कोकणात ठाणे, मुंबई आणि रायगड या तीन जिल्ह्यात हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. अशातच जाणून घेऊयात 25 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे ही वाचा : '8 महिलांचे 35 व्हिडिओ, अशोक खरातने भोंदूगिरी करून महिलांवर केले बलात्कार', फडणवीसांनी सभागृहात सगळंच सांगितलं

कोकण 

कोकणात मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यात उष्ण व दमट वातावरणाची शक्यता आहे, तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज जारी केला आहे. 

मध्य महाराष्ट्र 

मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सांगलीत हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला आहे.  जळगाव, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे, तसेच सोलापूरमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

 मराठवाडा

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात उष्ण आणि कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला. तसेच परभणी, बीड आणि हिंगोलीत हलक्या पावसाची अधिक शक्यता आहे. लातूर, नांदेड आणि धाराशिवमध्ये अवकाळी पावसाची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हे वाचलं का?