शिरुरमध्ये चिमुकला झोका खेळत होता, दबा धरुन बसलेला बिबट्या आला अन्.., पाहा थरारक CCTV व्हिडीओ
Shirur leopard News : शिरुरमध्ये चिमुकला झोका खेळत होता, दबा धरुन बसलेला बिबट्या आला अन्.., पाहा थरारक CCTV व्हिडीओ
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शिरुरमध्ये चिमुकला झोका खेळत होता
दबा धरुन बसलेला बिबट्या आला अन्.., पाहा थरारक CCTV व्हिडीओ
Shirur leopard News : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात नुकताच 14 वर्षीय रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घराच्या अंगणात झोक्यावर खेळणारा एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला असून, हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे घराच्या अंगणात हा चिमुकला झोक्यावर खेळत असताना बिबट्या अचानक कुत्र्याची शिकार करण्यासाठी थेट कंपाऊंडमध्ये घुसला. आणि काही क्षणातच चिमुकल्याने प्रसंगावधान राखत घरात धाव घेतली. कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने बिबट्या घाबरून पळून गेला. बिबट्याच्या या थरारक हालचाली सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात आणखी एक बिबट्या वनविभागाने जेरबंद केलाय... गेल्या दोन दिवसांत एका बिबट्याचा खात्मा करण्यात आलाय तर दोन बिबटे जेरबंद करण्यात यश आलंय. संतप्त ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर या मोहिमेला वेग आलाय. वनविभागाने तीस पिंजऱ्यांचे जाळे या परिसरात उभं केलंय. त्यातील पिंपरखेडमध्येचं हा दुसरा बिबट्या जेरबंद झालाय.
वनमंत्र्यांकडून केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जाणार
पिंपरखेड मध्ये तेरा वर्षीय रोहन बोंबे ठार झाला त्याचं परिसरात वनविभागाने ही मोहीम राबवली आहे. शिरूरसह जुन्नर, आंबेगाव आणि खेड या चार तालुक्यातील बिबटे गुजरातच्या वनतारा आणि विविध जिल्ह्यातील वनक्षेत्रात इथले बिबटे स्थलांतरित करण्याचा निर्णय झालाय. वनमंत्री गणेश नाईक यांनी तसा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्याची तयारी ही सुरु केलीये. बिबट आणि मानव हा संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलली जातायेत.










