राज ठाकरेंचा पुढचा मार्ग खडतर, मनसे अध्यक्षांविरोधात वॉरंट जारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण 2008 सालच्या एका प्रकरणात राज ठाकरेंविरोधात कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे.
राज ठाकरेंचा पुढचा मार्ग खडतर, मनसे अध्यक्षांविरोधात वॉरंट जारी
raj thackeray likely to face difficulties warrants issued against mns president(फाइल फोटो)

स्वाती चिखलीकर, सांगली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांचा विषय हाती घेतला आहे. तेव्हापासून हा मुद्दा प्रचंड चर्चेत आहे. पण असं असताना दुसरीकडे राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टाने वॉरंट जारी केला असल्याची माहिती आता समोर आली आहे.

सांगलीतील शिराळा कोर्टाने दिलेल्या तारखेला हजर न राहिल्याने राज ठाकरे यांच्याविरुद्ध शिराळा न्यायालयाने काढला आता वॉरंट जारी केला आहे.

परप्रांतियांना मनसैनिकांनी केलेल्या मारहाण प्रकरणी 2008 साली राज ठाकरे यांना कल्याणमध्ये अटक करण्यात आली होती. ज्यानंतर संपूर्ण राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते. तेव्हा सांगली जिल्ह्यात मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी जवळ आंदोलन करून दुकानांची तोडफोड केली होती.

यानंतर याबाबतचा गुन्हा शिराळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. .याच प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे जिल्हाअध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासहित अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्यामध्ये राज ठाकरे यापूर्वी एकदा न्यायालयात हजर देखील झाले होते. मात्र पुढील तारखांना गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने आता राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट काढलं आहे.

राज ठाकरेंच्या 'त्या' भाषणावर आजच कारवाई करणार: पोलीस महासंचालक

दुसरीकडे औरंगाबादमध्ये राज ठाकरेंनी जे भाषण केलं आहे. त्या भाषणावर पोलीस आजच करावाई करतील अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे.

'कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्पष्ट आदेश दिले आहेत. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. एसआरपीएफ आणि होमगार्ड मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणीही कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.'

'औरंगाबादचे पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाबाबत संपूर्ण अभ्यास केलेला आहे. त्या भाषणाच्या अनुषंगाने जी आवश्यक कारवाई करायची आहे त्यासाठी ते सक्षम आहेत आणि ते ती करतील.'

raj thackeray likely to face difficulties warrants issued against mns president
'मिशन राज/प्लान आर' : मनसे नेत्यांना दिलेल्या नोटीसमध्ये पोलिसांनी काय दिलाय इशारा?

'कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्याविरोधात कडक कारवाई करु. आमच्या 87 एसआरपीएफ कंपन्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तैनात आहेत. सर्व पोलिसांना सूचना दिल्या आहेत की, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देऊ नका.'

'मी आपल्याला आधीच सांगितलं आहे की, औरंगाबाद पोलीस आयुक्त हे याची चौकशी करुन आवश्यक कारवाई आजच करतील. ते कारवाई करण्यात सक्षम आहेत. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली आहे.' असं पोलीस महासंचालकांनी सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.