Pran Pratishtha : काय असते प्राणप्रतिष्ठा ज्यामुळे दगडाच्या मूर्तीत प्रकटतो देव!
कोणत्याही मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी धर्मशास्त्रानुसार विधी आणि मंत्रोच्चार करून पूजा केली जाते. कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना अनेक टप्पे पार करावे लागतात.
ADVERTISEMENT

What is Pran Pratishtha in Marathi : दीर्घ प्रतिक्षेनंतर २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. १६ जानेवारीपासून अयोध्येत प्राणप्रतिष्ठा पूजा सुरू झाली होती. पण, प्राणप्रतिष्ठा का केली जाते? मूर्तीतमध्ये देवाचे अस्तित्व आणणारी ही पूजा काय असते, हेच जाणून घ्या.
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसाठी २२ जानेवारी २०२४ रोजीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी पूजा सुरू झाली. विशेष मंत्रोच्चारात रामलल्लाला स्नान घालण्यात आले. त्यानंतर विधिवत वस्त्र नेसवण्यात आली. त्यानंतर आरती करण्यात आली.
प्राणप्रतिष्ठा का असते आवश्यक?
हिंदू धर्मानुसार कोणत्याही मंदिरात देवी-देवतांची मूर्ती स्थापन करण्याआधी त्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक असते. प्राणप्रतिष्ठेचा अर्थ आहे की मूर्तीमध्ये प्राण आणणे. जिवंत शक्ती आणणे. तोपर्यंत मूर्ती देव नसते. देवाचे प्राण त्यात आणण्यासाठी प्राणप्रतिष्ठा करावीच लागते.
हेही वाचा >> लालकृष्ण अडवाणी आमंत्रण मिळूनही अडवाणी गेले नाही रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला, कारण…
कोणत्याही मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी धर्मशास्त्रानुसार विधी आणि मंत्रोच्चार करून पूजा केली जाते. कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना अनेक टप्पे पार करावे लागतात. या सर्व अवस्थांना सहवास म्हणतात.