Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं, तुमच्या शहरातील नेमके दर काय?

relief on oil prices petrol becomes cheaper in all cities see what are the rates for petrol and diesel in your city
relief on oil prices petrol becomes cheaper in all cities see what are the rates for petrol and diesel in your city(प्रातिनिधिक फोटो)

Centre Reduces Excise Duty on Fuel: मुंबई: महागाई सातत्याने वाढत असून आपल्या विरोधात जनमत तयार होत असल्याची जाणीव येताच केंद्रातील मोदी सरकारने काल (21 मे) पेट्रोल-डिझेलवरील कर कपातीचा अत्यंत मोठा निर्णय घेतला. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) करात कपात केल्याने देशातील जनेतला मोठा दिलासा मिळाला आहे. आज (22 मे 2022) देशभरात पेट्रोल साडेनऊ रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं आहे. उत्पादन शुल्कात (Excise Duty)कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं आहे. त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत हे आपण जाणून घेऊयात.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संध्याकाळी ट्विट करून जनतेला ही आनंदाची बातमी दिली की केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी केले आहे. याआधी, 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवर 5 रुपये प्रति लिटरने कमी केले होते.

त्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत होती. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत असल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरही झाला.

दिल्ली ते मुंबई पेट्रोल आणि डिझेल किती स्वस्त?

राजधानी दिल्लीत काल म्हणजेच शनिवारी पेट्रोलचा दर 105 रुपये 41 पैसे होता, जो आता 96 रुपये 72 पैसे प्रति लिटर झाला आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 8 रुपये 69 पैशांनी घट झाली आहे. तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 9 रुपये 16 पैशांनी स्वस्त झाले आहे. मुंबईत पेट्रोल आता 111.35 रुपये प्रतिलिटर आहे. विशेष म्हणजे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार महानगरांपैकी फक्त दिल्लीतच पेट्रोलचा दर 100 रुपयांपेक्षा कमी आहे, तर उर्वरित तीन महानगरांमध्ये मात्र 100 रुपयांच्या पुढे पेट्रोलची विक्री होत आहे.

त्याचप्रमाणे दिल्लीकरांना डिझेलच्या दरात प्रतिलिटर सात रुपये पाच पैशांनी दिलासा मिळाला आहे. कालपर्यंत दिल्लीत एक लिटर डिझेल 96 रुपये 67 पैशांनी विकले जात होते मात्र आजपासून ते 89 रुपये 62 पैशांनी विकले जात आहे. त्याचप्रमाणे मुंबईत डिझेलचा दर 104 रुपये 77 पैशांवरून आता 97 रुपये 28 पैसे प्रति लिटरवर आला आहे. मुंबईत डिझेल 7 रुपये 49 पैशांनी स्वस्त झाले आहे.

डिझेल कोलकात्यात 7 रुपये 7 पैसे आणि चेन्नईमध्ये 6 रुपये 70 पैशांनी स्वस्त झाले आहे. राज्य स्तरावर वाहनांच्या इंधनावरील व्हॅटच्या वेगवेगळ्या दरांमुळे, शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगळे आहेत.

प्रमुख महानगरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर

> दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

> मुंबईत पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

> कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

> चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

relief on oil prices petrol becomes cheaper in all cities see what are the rates for petrol and diesel in your city
2022 मधील सर्वात मोठी बातमी: पेट्रोल 8 आणि डिझेल 6 रुपयांनी स्वस्त, LPG मध्ये 200 रुपयांची कपात

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

>मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 113.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये.

>पुण्यामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.95 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.44 रुपये.

>नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.83 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.29 रुपये.

>नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये.

>औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 113.03 रुपये तर डिझेलचा दर 98.95 रुपये.

केंद्रानंतर 'या' दोन राज्यांनी व्हॅट केला कमी

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत घेतलेल्या निर्णयानंतर केरळच्या पिनाराई विजयन सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 2.41 रुपये आणि 1.36 रुपये प्रति लिटर कपात केल्याची घोषणा केली आहे. केंद्रानंतर केरळ हे पहिले राज्य आहे ज्याने पेट्रोल आणि डिझेलवर सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.

केरळमध्ये आता पेट्रोल 11.91 रुपयांनी आणि डिझेल 8.36 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

याशिवाय राजस्थान सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कही कमी केले आहे. राजस्थानमध्ये पेट्रोलवर प्रतिलिटर 2.48 रुपये आणि डिझेलवर 1.16 रुपयांनी व्हॅट कमी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यस्थानमध्ये पेट्रोल 10.48 रुपयांनी तर डिझेल 7.16 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in