25 January 2025 Gold Rate: आरारारा! आज पुन्हा सोनं गडगडलं, चांदीचे भावही गगनाला भिडले, वाचा आजचे दर

मुंबई तक

Today Gold Rate : सोन्या-चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्या-चांदीच्या दरात अशाचप्रकारे वाढ होत राहिली तर येणाऱ्या काही दिवसांत सोनं-चांदी ऑल टाईम हायवर पोहोचलेली दिसेल.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीचे भाव वाचून अनेकांना फुटलाय घाम

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव किती रुपयांनी वाढले?

point

मुंबईत आत 1 तोळा सोन्याचे दर काय?

Today Gold Rate : सोन्या-चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्या-चांदीच्या दरात अशाचप्रकारे वाढ होत राहिली तर येणाऱ्या काही दिवसांत सोनं-चांदी ऑल टाईम हायवर पोहोचलेली दिसेल. नवीन वर्ष 2025 च्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाल्याचं समोर आलंय. आज 25 जानेवारी 2025 ला सोन्याचे भाव वाढले आहेत.

भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 82000 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 75 हजारांपार झाली आहे. चांदीच्या भावतही वाढ झाली आहे. चांदी आज एक हजार रुपयांनी महागली आहे. आज एक किलोग्रॅमच चांदीचे दर 97600 रुपये आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

दिल्ली

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 82580 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 75710 रुपये झाले आहेत. 

मुंबई 

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 82430 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 75560 रुपये झाले आहेत. 

हे वाचलं का?