Dombivli blast : गृह प्रवेशाचे स्वप्न राहिले अधुरेच! 'त्या' एका गोष्टीवरून भावाने ओळखला मृतदेह

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

डोंबिवली : Dombivli blast : डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC) फेज 2 येथे झालेल्या ब्लास्टमध्ये रोहिणी कदम (वय 25) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परंतु मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटत नव्हती. रोहिणीने परिधान केलेला मेहंदी रंगाचा ड्रेस आणि तिच्या दाताला बसवण्यात आलेल्या तारेवरून तिच्या चुलत भावाने तो मृतदेह रोहिणीचाच असल्याचं सांगितलं. रोहिणीच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. (25-year old Rohini Kadam dies in Dombivli blast brother identifies body from dress and teeth braces)

डोंबिवली एमआयडीसी परिसरात गुरुवारी (23 मे) अमुदान केमिकल कंपनीत स्फोट झाला. नवीन अपडेटनुसार, या स्फोटात 11 जणांचे मृत्यू झाले असून 64 जण जखमी आहेत, डोंबिवलीतील काही रूग्णालयांमध्ये जखमींचे उपचार सुरू आहे.

हेही वाचा: 'उद्धव ठाकरेंनी काहीही केलं नाही', फडणवीस ठाकरेंवर चिडले

फोटोमध्ये दिसणारी ही तरुणी आता या जगात नाहीये. रोहिणी कदम अस या तरुणीचं नाव आहे. मूळची रायगड जिल्ह्यातील कोलमांडला येथील राहणारी रोहिणी कदम ही 25 वर्षांची असून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोहिणीने पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. एमआयडीसीत एका कंपनीत ती सध्या जॉब करत होती. इतर मुलींप्रमाणे रोहिणीचीही अनेक स्वप्न होती, मात्र  डोंबिवलीच्या ब्लास्ट मध्ये तिचे सर्व स्वप्न जळून खाक झाले. रोहिणी खूप खुश होती कारण गुरुवारी रोहिणीच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि शुक्रवारी डोंबिवलीमधील आजदे येथे नवीन घेतलेल्या घराचे गृहप्रवेश होणार होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा: पोर्श कार अपघात प्रकरणी 'त्या' पोलिसांवर प्रचंड मोठी कारवाई!

ज्या अमुदान कंपनीत स्फोट झाला, त्याच्या बाजूच्या कंपनीत रोहिणी काम करत होती. स्फोटाची माहिती रोहिणीच्या नातेवाईकांना समजताच त्याचवेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शास्त्रीनगर रूग्णालयात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आणण्यात आला आहे अशी माहिती त्यांना देण्यात आली. रोहिणीचे नातेवाईक याठिकाणी पोहचले त्यांना मृतदेह दाखवण्यात आला. परंतू मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटत नव्हती.

हेही वाचा: अखेर 4 दिवसानंतर अजितदादा 'त्या' अपघातावर पहिल्यांदा बोलले!

यावेळी रोहिणीने परिधान केलेला मेहंदी रंगाचा ड्रेस आणि तिच्या दाताला बसवण्यात आलेल्या तारेवरून तिच्या चुलत भावाने हा मृतदेह रोहिणीचाच असल्याचं सांगितलं. त्यानंतर खात्री करण्यासाठी रोहिणीच्या सख्या भावाला सुद्धा हॉस्पिलमध्ये बोलावण्यात आलं. त्यानंतर ही रोहिणीच असल्याचं समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. रोहिणीच्या आजदे येथील घरात गृहप्रवेश होणार होता, त्यामुळे ती आनंदात होती. अस एका शेजाऱ्याने सांगितलं, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. या धक्कादायक घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT