Today Gold Rate : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याला झळाळी! आजचा भाव वाचून तुम्हालाही फुटेल घाम 

मुंबई तक

Today Gold Latest Rate: नवीन वर्ष 2025 च्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षाच्या पहिल्याच महिन्यातील तिसऱ्या दिवशी म्हणजेच 3 जानेवारी 2025 ला सोन्याच्या दरात उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

एक ग्रॅम सोन्याची किंमत रु.7275.
एक ग्रॅम सोन्याची किंमत रु.7275.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्याचे भाव पुन्हा भिडले गगनाला!

point

देशातील या प्रमुख शहरांत सोन्याचा आजचा भाव काय?

point

मुंबईत 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate In India : नवीन वर्ष 2025 च्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षाच्या पहिल्याच महिन्यातील तिसऱ्या दिवशी म्हणजेच 3 जानेवारी 2025 ला सोन्याच्या दरात उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या भावात 330 रुपयांनी वाढ झाली आहे. 22 कॅरेट गोल्ड 300 रुपये आणि 24 कॅरेट गोल्डचा भाव 330 रुपयांनी वाढला आहे. 1 आणि 2 जानेवारीलाही सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं समोर आलं होतं. 

3 जानेवारीला भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 78000 रुपये झाले आहेत. तर सोन्याच्या 22 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71 हजारांपार झाले आहेत.  सोन्यात मागील वर्षी गुंतवणूक करणाऱ्यांना 27 टक्के रिटर्न मिळालं आहे. वर्ष 2010 नंतर सोन्याचे व्यवहार सर्वात जबरदस्त राहिले आहेत. आज 3 जानेवारीला चांदीच्या भावात घट झाल्याचं समोर आलंय. आज एक किलोग्रॅम चांदीचे भाव 90500 रुपये आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

दिल्ली

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78480 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71950 रुपये आहेत.

मुंबई

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78330 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71800 रुपये आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp