5th April Gold Rate : वीकेंडला ग्राहकांची मज्जाच मज्जा! सोन्या-चांदीचे भाव गडगडले, मुंबईसह 'या' शहरांतील भाव वाचाच
Today Gold Rate :सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु, आज चैत्र नवरात्रीच्या महाअष्टमीला सोनं दरवाढीला ब्रेक लागला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु, आज चैत्र नवरात्रीच्या महाअष्टमीला सोनं दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज शनिवारी 5 एप्रिलला सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत सोनं आज एक हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91 हजार रुपयांच्या पार गेले आहेत.
तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 84 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. सोन्याच्या दरात घट झाल्यानंतरही गोल्ड या दिवसांत ऑल टाईम हाय रेकॉर्डवर आहे. एक्सपर्टच्या माहितीनुसार, येणाऱ्या काही दिवसांत सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. गोल्डसोबतच चांदीच्या दरातही घट झाल्याचं समोर आलंय. चांदीचे प्रति किलो ग्रॅमचे दर 95000 रुपये झाली आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 93380 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 85600 रुपयांवर पोहोचले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत.