8 February Gold Rate: आरारारा! आज वाढली सोन्याची चमक! 'या' शहरांत सोन्याला झळाळी, वाचा आजचे दर

मुंबई तक

Today Gold Rate In India : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आजही सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. तर चांदीच्या भावात कोणताही बदल झालेला नाही.

ADVERTISEMENT

आज, एक ग्रॅम सोन्याची किंमत ६८६५ रुपये आहे.
आज, एक ग्रॅम सोन्याची किंमत ६८६५ रुपये आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या किंमतीत किती रुपयांनी झाली वाढ?

point

सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate In India : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आजही सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. तर चांदीच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. आज सोन्या-चांदीचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.आज दिल्लीत सोन्याच्या 18 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 120 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे सोन्याची आजची किंमत 65130 रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय सोन्याच्या 18 कॅरेटच्या प्रति 100 ग्रॅमचे भाव 1200 रुपयांनी वाढले असून याची किंमत 651300 रुपयांवर पोहोचली आहे.

सोन्याच्या 22 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव

आज सोन्याच्या 22 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 150 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सोन्याची किंमत 79600 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेटच्या प्रति 100 ग्रॅमच्या सोन्याची किंमत 1500 रुपयांनी वाढली असून सोन्याचे दर 796000 रुपयांवर पोहोचले आहेत.

सोन्याच्या 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 

आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 160 रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे सोन्याची आजची किंमत 86820 रुपयांवर पोहोचली आहे. तसच सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमचे दर 1600 रुपयांनी वाढले असून सोन्याची किंमत 868200 रुपयांवर पोहोचली आहे. आज चांदीच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी कोणतेही बदल झाले नाहीत. आज चांदीचे एक किलोग्रॅमचे दर 99500 रुपये आहेत. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! 'या' महिलांना योजनेतून वगळलं! आदिती तटकरेंनी दिली सर्वात महत्त्वाची माहिती

मुंबई

आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7930 रुपयांवर पोहोचली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp