8 March 2025 Gold Rate : बाईईई! मज्जाच मज्जा, आज महिला दिनी स्वस्त झालं सोनं, मुंबईसह 'या' शहरांतील भाव वाचा

मुंबई तक

Gold Rate In India : जागतिक महिला दिनी म्हणजे आज 8 मार्चला सोनं स्वस्त झालं आहे. होळीच्या आधी सोनं खरेदी करण्याची ही सुवर्ण संधी आहे. सोन्याच्या दरात मागील काही दिवसांपासून मोठी घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Gold Rate In India : जागतिक महिला दिनी म्हणजे आज 8 मार्चला सोनं स्वस्त झालं आहे. होळीच्या आधी सोनं खरेदी करण्याची ही सुवर्ण संधी आहे. सोन्याच्या दरात मागील काही दिवसांपासून मोठी घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशात 24 आणि 22 कॅरेट सोनं 300 रुपयांनी स्वस्त झालं आहे. भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87000 रुपये झाले आहेत. तर सोन्याच्या 22 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 79 हजारांच्या पार झाले आहेत. 

दरम्यान, चांदीच्या भावात आज वाढ झाल्याचं समोर आलं आहे. 7 मार्चच्या तुलनेत 8 मार्चला चांदीच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. एक किलोग्रॅम चांदीचे दर 99200 रुपयांवर पोहोचले आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट गोल्डचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

देशातील मोठ्या शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय?

दिल्ली

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87300 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 80040 रुपये झाले आहेत.

मुंबई 

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87150 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 79890 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?