Mumbai Airport : व्हीलचेअरच्या नादात गमावला जीव, वृद्धासोबत घडलं तरी काय?

रोहिणी ठोंबरे

Air India : मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एअर इंडियाच्या विमानाने न्यूयॉर्कहून मुंबईला येत असलेल्या 80 वर्षीय व्यक्तीला व्हीलचेअर न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Air India : मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एअर इंडियाच्या विमानाने न्यूयॉर्कहून मुंबईला येत असलेल्या 80 वर्षीय व्यक्तीला व्हीलचेअर न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या एका वृद्ध प्रवाशाने मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर व्हीलचेअरची विनंती केली होती, मात्र व्हीलचेअरची प्रचंड मागणी असल्याने त्याला थांबण्यास सांगण्यात आले. यानंतर वृद्ध व्यक्ती पत्नीसह टर्मिनलमधून बाहेर पडू लागला. दरम्यान, इमिग्रेशन प्रक्रियेदरम्यान पडून त्याचा मृत्यू झाला. (Air India Elderly Passanger dies at Mumbai Airport Viral News)

12 फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्कहून एअर इंडियाच्या विमानातून प्रवासी उतरल्यानंतर विमानतळावर ही घटना घडली. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने शुक्रवारी (16 फेब्रुवारी) याबाबत माहिती दिली. प्रवासी 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचा होता.

या घटनेबाबत एअरलाइनने सांगितले की, 'दुर्दैवी घटनेत, 12 फेब्रुवारीला न्यूयॉर्कहून मुंबईला जाणारा आमचा एक प्रवासी त्याच्या पत्नीसह इमिग्रेशनसाठी जात असताना अस्वस्थ झाला, त्यांची प्रकृती बिघडली यानंतर विमानतळावरील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.'

एअर इंडियाने पुढे सांगितले की, व्हीलचेअरच्या प्रचंड मागणीमुळे, वृद्ध प्रवाशाला एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांनी व्हीलचेअरसाठी थांबण्याची विनंती केली, परंतु ते आपल्या पत्नीसह चालत गेले.

हे वाचलं का?

    follow whatsapp